पुणे - इंदापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची निमगांव केतकी येथे सभा झाली. यावेळी इराणींनी काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.
वेळेनुसार चालणे आणि गरिबांचा विचार करणे हे कधीही काँग्रेस राष्ट्रवादीला जमले नाही. ज्याचे स्वतःचे घड्याळच बंद आहे, त्याला वेळेचे महत्व काय कळणार, असे म्हणत त्यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला. काश्मीरच्या नावाखाली देशाला लुटण्याचे काम तीन परिवारांनी केल्याचा आरोप इराणींनी यावेळी केला. कलम 370 हटविण्याविषयी संसदेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने तो आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्याचे सांगत त्याच्यावर आपण कशाला निर्णय घ्यायचा असे म्हणत विरोध केल्याचे इराणींनी सांगितले.
हेही वाचा - शिराळ्याचा इतिहास संभाजीराजेपासून प्रसिद्ध ; भाजपला घालवून पुन्हा तोच इतिहास घडवायचाय
राहुल गांधी जेएनयु मध्ये जाऊन सांगत होते की देशाचे दोन तुकडे होणार आहेत, असे सांगणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, असे असले तरी काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडूनच आता बाहेर पडू लागले आहे कि सत्तर वर्षात काहीच झाले नाही. त्यामुळे २१ तारखले जनता कमळाचे बटन दाबेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - मनोहर लाल खट्टर यांचे वादग्रस्त विधान, सोनिया गांधींना म्हणाले...'मेलेली उंदरीण'