ETV Bharat / state

पुणे : बारामतीत 63 वर्षीय तरुण योद्ध्याने केले रक्तदान - girija blood bank baramati news

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनीही नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्येही 30 व 31 मे या दिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यामध्ये 63 वर्षीय तरुण योद्धाने रक्तदानाचा हट्ट धरला व तो पूर्णही केला.

बारामतीत 63 वर्षीय तरुण योद्ध्याने केले रक्तदान

author img

By

Published : Jun 2, 2020, 3:30 PM IST

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान माजले असताना त्याला रोखण्यासाठी डॉक्टर, पोलीस, स्वच्छता करणारे कर्मचारी व शासन आपापल्यापरीने उत्तम कार्य करीत आहे. दरम्यान रक्ताचा तूटवडा असून रक्तदान करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात नागरिकांना आवाहन केले होते. बारामतीमधील गिरीजा ब्लडबँक मध्येही रक्ताचा तुटवडा आहे असे समजतात फेसबुक ग्रुप मधील तरुणांनी एकत्र येऊन 30 व 31 मे रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यामध्ये 63 वर्षीय तरुण योद्धाने रक्तदानाचा हट्ट धरला व तो पूर्णही केला.

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या परिस्थिीमुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवटा पडला होता. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनीही नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्येही 30 व 31 मे या दिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याबाबात 63 वर्षांच्या इसामिया कासीम आत्तार यांना शिबिराची माहिती मिळताच ते रक्तदानास पोहोचले. परंतु जास्त वय असल्यामुळे त्यांना रक्तदान करण्यास नकार दिला गेला. मात्र, त्यांनी रक्तदानाचा चंग बांधून सर्व चाचण्या करून शेवटी रक्तदान केले. सोबतच, डॉक्टर, पोलीसबांधवांच्या सोबत आम्ही सर्व वयोवृद्ध योद्धे आहोत आणि आपण कोरोनाला नक्कीच हरवू असा विश्वास दिला.

या शिबिरामध्ये परिसरातील मुली व महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता. शिबिरामध्ये 103 बाटल्यांचे रक्तसंकलन केले गेले. रक्तदान शिबिराचे आयोजन गिरिजा ब्लड बँक येथे 30 व 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत योद्धा प्रोडक्शन पब्लिसिटी, बारामती उद्योगसमूह यांच्या वतीने आयोजन केले होते. शिबिर संपन्न होण्यास भूषण सुर्वे, प्रताप कर्णे, योगेश नालंदे, अक्षय येवले, नानासाहेब साळवे, भारत दळवी यांनी परिश्रम घेतले. दरम्यान बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी शिबिरास भेट देऊन पाहणी केली. असे समाजोपयोगी कार्यक्रम तरुणांनी राबवावेत असे आवाहन करून आयोजकांचे कौतुकही केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी श्री शंभू चॅरिटेबल ट्रस्टचे मोलाचे सहकार्य लाभले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.