ETV Bharat / state

Life Imprisonment In Rape Case : सहा वर्षांच्या मुलीवर केला होता अत्याचार.. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा - बारामती जिल्हा व सत्र न्यायालय

अवघ्या सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व सतरा हजार रुपये दंडाची शिक्षा ( Life Imprisonment For Accuse In Girl Rape Case ) सुनावली. बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ( Baramati District Session Court ) हा निकाल दिला आहे. २०२० मध्ये ही घटना घडली होती.

सहा वर्षांच्या मुलीवर केला होता अत्याचार.. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

author img

By

Published : Feb 16, 2022, 7:55 PM IST

बारामती - सहा वर्षांच्या मुलीसोबत अत्याचार करणाऱ्या अनिल बबन बनकर (रा. टिळेकर वस्ती, पिलानवाडी, ता. दौंड) यास बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश जे.पी. दरेकर यांनी ( Baramati District Session Court ) जन्मठेप व सतरा हजार रुपये दंडाची शिक्षा ( Life Imprisonment For Accuse In Girl Rape Case ) ठोठावली. जून 2020 मध्ये पिलानवाडी येथे ही घटना घडली होती.

सात साक्षीदार तपासले

घटना घडल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली होती. फौजदार एस. एस. वाघमोडे यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अँड. प्रसन्न जोशी यांनी या प्रकरणात सात साक्षीदार तपासले.

वैद्यकीय पुरावा धरला ग्राह्य

याप्रकरणी फिर्यादी हीच न्यायालयात फितूर झाली होती. सात वर्षांच्या पिडीतीने न्यायालयात सविस्तर घटना विशद केली. डॉ. शशिकला एम. यांनी सादर केलेला न्याय वैद्यकीय पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानला. प्रसन्न जोशी यांचा युक्तीवाद, न्यायवैद्यक अहवाल, साक्षीदारांच्या साक्षी यांचा विचार करुन न्यायालयाने अनिल बनकर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामध्ये दंडाच्या रकमेपैकी दहा हजार रुपये पिडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलिस नाईक वेणुनाद ढोपरे व एन. ए. नलावडे यांनी सहकार्य केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.