पुणे - कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आणखी सहा साथीदारांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. याशिवाय पोलिसांनी चार महागडी वाहनेही जप्त केल्या आहेत.
समिर प्रमोद पाटील (वय 29 वर्षे, बल्लाळ अपार्टमेंट, इंदिरा शंकर नगरी कोथरूड), अतुल बाबू ससार (वय 34 वर्षे, सम्राट मित्र मंडळ जवळ मोकाटे नगर, कोथरूड), राहुल दत्तात्रय उभे (वय 36 वर्षे, एमआयटी कॉलनी शास्त्री नगर, कोथरूड), सागर शंकर हुलावळे (वय 32 वर्षे, सरस्वती विहार कॉलनी, शास्त्री नगर, कोथरूड), रामदास ज्ञानेश्वर मालपोटे (वय 34 वर्षे, शिवसाई नगर सुतारदरा, कोथरूड) आणि कैलास भागुजी पडवळ (वय 32 वर्षे, श्रीराम कॉलनी सुतारदरा, कोथरूड), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याशिवाय यातील मुख्य आरोपी गजानन मारणे याने तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर ज्या वाहनांच्या ताफ्यातून मिरवणूक काढली होती. त्यातील चार महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. कोथरूड परिसरात जमाबंदी कायद्याचे उल्लंघन करून बेकायदा गर्दी जमवल्याप्रकरणी आणि दहशत पसरवल्याप्रकरणी गुंड गजानन मारणेसह दीडशे ते दोनशे जणांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आतापर्यंत मुख्य आरोपी गजानन मारणे यांच्यासह 22 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप