ETV Bharat / state

शिरूर शहरातील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद, 5 साथीदारांच्याही आवळल्या मुसक्या - City Bora college firing Case

मोक्का लागू असलेल्या आरोपी मुकेश कुर्लप याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याला मदत करणाऱ्या पाच जणांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

शिरूर शहरातील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

author img

By

Published : May 8, 2021, 9:43 AM IST

पुणे - शिरूर शहरातील सिटी बोरा कॉलेज रस्त्यावर 26 जानेवारी झालेला गोळीबारातील प्रमुख आरोपी फरार झाला होता. मोक्का लागू असलेल्या आरोपी मुकेश कुर्लप याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याला मदत करणाऱ्या पाच जणांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी ही माहिती दिली.

बाबु उर्फ मुकेश चंद्रकांत कुर्लप (वय 31 वर्षे), बाबु उर्फ परशुराम मन्छिद्र म्याकल (वय 21 वर्षे, दोघेही रा. कामाठीपुरा,शिरूर), शुभम दत्तात्रय दळवी (वय 25 वर्षे, रा. प्रितमप्रकाश नगर, गणेश मंदिरामागे शिरूर), शुभम नरेश सिंग (वय 24 वर्षे,रा. गुजरमळा, शिरूर), अमोल हनुमंत करजुले (वय 24 वर्षे,रा. बाबुरावनगर, शिरूर), प्रसाद सुनील यादव (वय 31 वर्षे रा.उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

चंदननगर मधून अटक

शिरूर येथे २६ जानेवारी २०२१ रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येत होता. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत कुलप हा फरार होता. तो प्रसाद यादव याच्या घरी लपून बसला आहे, याची खात्रीलायक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार यादव यांच्याकडे चौकशी केली असता, त्याने तो तिथे नसल्याची माहिती दिला.

त्यानंतर यादव याने मुकेश कुर्लप याला चंदननगर, शेजवळ पार्क येथे आपल्या मित्राच्या खोलीत आसरा देऊन लपवून ठेवले. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या ठिकाणी जाऊन मुकेश कुर्लप याला ताब्यात घेतले. त्याला आसरा देणाऱ्या पाच जणांवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, देशमुख, सहायक फौजदार दिलीप जाधवर, दत्तात्रय जगताप, राजेंद्र थोरात, पो.हवा मुकुंद आयचीत, सागर चंद्रशेखर, विद्याधर निचीत, प्रमोद नवले, मुकुंद कदम, पोलीस नाईक राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, गुरू जाधव, नितीन भोर, पो.कॉ अक्षय नवले, पो.को प्रसन्नजीत घाडगे, पुनम गुंड, सुजाता कदम या पथकाने केली आहे.

आरोपींना पुढील तपासासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.