ETV Bharat / state

ह्रदयद्रावक.. बहिणीच्या दशक्रियेच्या दिवशीच सख्ख्या भावाचा कोरोनाने मृत्यू

author img

By

Published : May 30, 2021, 7:04 PM IST

कोरोना महामारीच्या संकटात मनाला वेदना देणाऱ्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. येथे बहिणीच्या दशक्रिया विधीदिवशीच सख्ख्या भावाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

sister and brother both die due to corona

पुणे - कोरोना महामारीच्या संकटात मनाला वेदना देणाऱ्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. येथे बहिणीच्या दशक्रिया विधीदिवशीच सख्ख्या भावाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील बाळासाहेब हिंगे यांच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव होऊन संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. त्यात बाळासाहेब हिंगे व त्यांच्या पत्नी यांनी कोरोनावर यशस्वी मात केली मात्र आई वडिलांनी कोरोनावर मात करत असताना लेकीचा मात्र मृत्यू झाला. त्यावेळी भावावर रुग्नालयात उपचार सुरु होते. याचदरम्यान बहिणीच्या दशक्रियेच्या दिवशीच भावाचाही मृत्यू झाला आहे.

माधवी हिंगे पाटील हिचे डीएडपर्यंत शिक्षण झाले होते. तिने ज्योतिष शास्त्र, अंक शास्त्र विषयात पदवी घेतली होती. तर तिचा धाकटा भाऊ मयुर हा संगणक इंजिनिअर होता. पंधरा दिवसांपूर्वी आई-वडील आणि भाऊ-बहीण एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

कोरोनाने एकामागून एक पोटची मुलं हिरावल्यामुळे हिंगे-पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तर ते राहत असलेल्या परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माधवी आणि मयुर यांचे वडील शेती करत असून आई पंचायत समिती आंबेगाव येथे अंगणवाडी केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहे. उचशिक्षित दोन्ही बहिण-भाऊ तरुण वयातच कोरोनाचे बळी ठरल्याने पुण्याच्या ग्रामीण भागात हळहळ व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.