पुणे - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा 'स्वरसागर' पुरस्काराने गौरव करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढाकाराने मागील २० वर्षांपासून 'स्वरसागर' महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवात दिग्गज कलाकारांचा दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
हेही वाचा - ''शास्त्रीय संगीत नव्या पद्धतीने मांडून आजच्या पिढीला जवळ आणण्यासाठी प्रयत्नशील''
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुलताना यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा देत मराठी शास्त्रीय संगीत सादर केले. 'आज खूप आनंद होत आहे. माझा कार्यक्रम सादर करण्यासाठी मी १५ वर्षानंतर पिंपरी-चिंचवड शहरात आले आहे. शास्त्रीय संगीताचे आपण खूप मोठे चाहते आहात, अशी चर्चा महाराष्ट्रभर आहे,' अशी प्रतिक्रिया यावेळी सुलताना यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - VIDEO: क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा, तलवारीने सपासप वार
महोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या दिग्गज कलाकारांना ऐकण्यासाठी प्रेक्षकांच्या मोठ्या गर्दीची अपेक्षा असते. मात्र, आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे बेगम परवीन सुलताना यांच्या कार्यक्रमाची माहिती प्रेक्षकांपर्यंत न पोहोचल्याने रिकाम्या खुर्च्या बघण्याची वेळ मान्यवरांवर आल्याचे बघायला मिळाले.