ETV Bharat / state

मावळमधून 'अजित' ठरले शिवसेनेचे श्रीरंग बारणे

मावळ मतदारसंघातुन शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव करत आपला गड कायम राखला. श्रीरंग बारणे हे विजयी झाल्याचे घोषित केल्यानंतर पनवेलमधील शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित रस्त्यावर उतरुन फटाके फोडून आनंद साजरा केला.

शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी
author img

By

Published : May 24, 2019, 12:07 PM IST

पुणे - लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेचा मतदारसंघ ठरलेल्या मावळ मतदारसंघातुन शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव करत आपला गड कायम राखला. राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मतमोजणीच्या सुरवातीलाच शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मुसंडी मारत लीडला आले होते. श्रीरंग यांना 7,02,243 इतकी मतं पडली तर राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना 4,88,499 इतकी मतं मिळाली आहेत. श्रीरंग बारणे हे विजयी झाल्याचे घोषित केल्यानंतर पनवेलमधील शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित रस्त्यावर उतरुन फटाके फोडून आनंद साजरा केला. यापूर्वी दोन वेळा श्रीरंग बारणे खासदार म्हणून निवडून आले आहेत.

शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

फक्त मावळमध्येच नाही तर राज्यात मोदी त्सुनामी आल्याचं पाहून युतीच्या कार्यकर्त्यांच्या आनंदात आणखी भर पडली आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत तोंड गोड केलं. त्यांनंतर रस्त्यावरील चौकात कार्यकर्त्यांनी वाद्याच्या ठेक्यावर तालही धरला.
या आनंदोत्सवात भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह इतर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी भाजप-शिवसेना युतीचे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात दिसत होते. कार्यकर्ते पक्षाचा झेंडा घेऊन ‘हर, हर मोदी’, ‘अब की बार मोदी सरकार’ अशा घोषणा देताना पाहायला मिळाले.

Intro:बातमीला व्हिडीओ सोबत जोडला आहे.

Location- पनवेल

लोकसभेत सर्वात चर्चेच मतदारसंघ ठरलेल्या मावळ मतदारसंघातुन शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव करत आपला गड कायम राखला. राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. Body:यापूर्वी दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना 7,02,243 इतकी मतं पडली तर राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना 4,88,499 इतकी मतं मिळाली आहेत. मतमोजणीच्या सुरवातीलाच शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मुसंडी मारत लीडला आले होते. श्रीरंग बारणे हे विजयी झाल्याचे घोषित केल्यानंतर पनवेलमधील शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित रस्त्यावर उतरुन फटाके फोडून आनंद साजरा केला.फक्त मावळमध्येच नाहीतर राज्यात मोदी त्सुनामी आल्याचं पाहून युतीच्या कार्यकर्त्यांच्या आनंदात आणखी भर पडली आणि एकमेकांना लाडू भरवत तोंड गोड केलं.त्यांनंतर रस्त्यावरील चौकात कार्यकर्त्यांनी वाद्याच्या ठेक्यावर तालही धरला. या आनंदोत्सवात भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह इतर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. Conclusion:भाजपा-शिवसेना युतीचे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात दिसत होते. पक्षाचा झेंडा घेऊन कार्यकर्ते ‘हर, हर मोदी’, ‘अब की बार मोदी सरकार’ अशा घोषणा देत होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.