शारजाह AFG vs BAN 1st ODI Update : अफगाणिस्तानचा संघ क्रिकेटमध्ये वेगानं प्रगती करत आहे. अफगाणिस्तान संघासाठी हे वर्ष खूप चांगलं असणार आहे. T20 विश्वचषक 2024 मध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्ताननं अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकून नवा इतिहास रचला होता. आता अफगाणिस्ताननं वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशला पराभूत करुन एक नवीन कामगिरी केली आहे.
𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐖𝐈𝐍! 🙌
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
AfghanAtalan have put on a remarkable bowling effort to beat Bangladesh by 92 runs in the 1st ODI and take an unassailable 1-0 lead in the series. 👏
Tremendous Result, Atalano! 🤩
#AfghanAtalan | #AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/84qczboKL2
मोहम्मद नबीची मोठी खेळी : वास्तविक, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरु झाली. शारजाह इथं खेळल्या गेलेल्या या पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्ताननं फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत दमदार कामगिरी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं 35 धावांच्या आत 4 विकेट गमावल्या, परंतु त्यानंतर कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी यांनी आपल्या संघाला 235 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हशमतुल्ला शाहिदीनं 52 तर मोहम्मद नबीनं 79 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 84 धावा केल्या. अशाप्रकारे बांगलादेशला 236 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य देण्यात अफगाणिस्तान संघाला यश आलं.
𝐖𝐈𝐍𝐍𝐈𝐍𝐆 𝐌𝐎𝐌𝐄𝐍𝐓𝐒! 🎉
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
AMG Shines and AfghanAtalan register a terrific victory in the 1st match of the ODI series against @BCBtigers!
Enjoy the winning moments here! 👏#AfghanAtalan | #AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/TvpJQ6AafQ
गझनफरनं रचला इतिहास : यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघानं 26 षटकांत 3 गडी गमावून 120 धावा केल्या होत्या. यानंतर अफगाणिस्ताननं त्यांचा युवा गोलंदाज अल्लाह गझनफरला गोलंदाजी दिली आणि बांगलादेशचा संपूर्ण संघ पुढील 23 धावांतच गारद झाला. अल्लाह गझनफरनं गोलंदाजी मिळताच बांगलादेशच्या लागोपाठ विकेट घेतल्या. गझनफरनं अवघ्या 6.3 षटकांत 26 धावा देत 6 फलंदाजांना आपले बळी ठरविलं. यासह 18 वर्षीय अफगाण फिरकीपटूनं इतिहास रचला. अल्लाह गझनफर वनडे क्रिकेटमध्ये 6 विकेट घेणारा तिसरा सर्वात तरुण गोलंदाज ठरला. गझनफरनं वयाच्या 18 वर्षे 231 दिवसांत हा पराक्रम केला. वकार युनूस आणि राशिद खान यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो वनडे क्रिकेटच्या इतिहासात तिसरा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे.
𝐒𝐈𝐗 𝐚𝐧𝐝 𝐚 𝐏𝐨𝐓𝐌 𝐚𝐰𝐚𝐫𝐝 𝐟𝐨𝐫 𝐀𝐌𝐆! 🙌
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
AM Ghazanfar delivered a phenomenal bowling performance for #AfghanAtalan and claimed his career-best figures of 6/26 to earn the Player of the Match award. 🤩
Outstanding bowling, Ghaz! 👏#GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/udGRCI1vK7
वनडे क्रिकेटमध्ये 6 बळी घेणारे सर्वात तरुण गोलंदाज :
- वकार युनूस- 18 वर्षे 164 दिवस
- राशिद खान- 18 वर्षे 178 दिवस
- अल्लाह गझनफर- 18 वर्षे 231 दिवस
ICYMI: #AfghanAtalan produced an incredible all-round effort in the first match to start the series with a big win and take a 1-0 lead in the series. 👏
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
🔗: https://t.co/25vfbsBVG3 #AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/I36i2Jyz83
आपल्या सहकाऱ्यांना टाकलं मागे : इतकंच नाही तर गझनफरनं अफगाणिस्तानसाठी वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि मोहम्मद नबी, रशीद खान आणि गुलबदिन नाईबला मागं टाकलं. आता फक्त राशिद खान त्याच्या पुढे आहे. बांगलादेशच्या शेवटच्या 7 विकेट 11 धावांतच पडल्या. अशाप्रकारे 235 धावा करुनही अफगाणिस्तान संघाला 92 धावांनी विजय मिळवता आला. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणिस्तान 1-0 नं आघाडीवर आहे.
Another Afghan spinner making headlines 👀
— ICC (@ICC) November 7, 2024
Allah Ghazanfar's first international five-wicket haul 🏏#AFGvBAN 📝 https://t.co/VoZUkROd0Z pic.twitter.com/zIUgQ7D0O7
वनडे सामन्यात अफगाणिस्तानसाठी सर्वोत्तम गोलंदाजी :
- 7/18 - रशीद खान विरुद्ध वेस्ट इंडिज, ग्रोस आयलेट, 2017
- 6/26 - अल्लाह गझनफर विरुद्ध बांगलादेश, शारजाह, 2024*
- 6/43 - रशीद खान विरुद्ध आयर्लंड, ग्रेटर नोएडा, 2017
- 6/43 - गुलबदिन नाईब विरुद्ध आयर्लंड, बेलफास्ट, 2019
- 5/17 - मोहम्मद नबी विरुद्ध आयर्लंड, शारजाह, 2024
- 5/19 - रशीद खान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह, 2024
18-year-old Allah Ghazanfar, who shone in the previous edition of the Men's #U19WorldCup, picked up a six-wicket haul to help Afghanistan crush Bangladesh In Sharjah 🔥#AFGvBAN 📝: https://t.co/92hUDb21eb pic.twitter.com/2fmJEc2D03
— ICC (@ICC) November 6, 2024
अफगाणिस्तान क्रिकेट संघाला नाही घरचं मैदान : अफगाणिस्तान क्रिकेट संघ त्यांच्या देशातील सुरक्षेच्या कारणास्तव दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलेला नाही. कारण या देशात दुसरा कोणताही संघ जाण्यास तयार नाही, तर काबूलमध्ये देशांतर्गत सामने होतात आणि अफगाणिस्तानचे मोठे खेळाडूही या स्पर्धेत भाग घेतात. आयसीसीचे सदस्य देश काबूलला जाणे टाळतात, त्यामुळं अफगाणिस्तान क्रिकेट संघ कधी भारतात तर कधी दुबई आणि शारजाह इथं इतर संघांविरुद्ध सामन्यांचं आयोजन करतो.
हेही वाचा :