ETV Bharat / state

कुसेगाव येथील श्री.भानोबा देव यात्रेला सुरुवात; दर्शनासाठी भाविकांची गर्दी - God-demon War Kussegaon Pune

शुक्रवारी श्री. क्षेत्र कुसेगाव येथील श्री. भानोबा देवाच्या यात्रेला सुरूवात झाली. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून कुसेगाव येथे देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली.

pune
श्री.भानोबा देव यात्रा
author img

By

Published : Dec 14, 2019, 9:47 AM IST

पुणे- शुक्रवारी (१३ डिसेंबर) श्री. क्षेत्र कुसेगाव येथील श्री. भानोबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कुसेगाव येथे देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली. देव-दानवांमधील युद्ध हे या यात्रेचे खास आकर्षण होते.

माहिती देताना नागरिक आणि यावत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील

शुक्रवारी पहिल्या दिवशी ढोल ताशाच्या गजरात कोयाळीकर गजे पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भानोबा देव-दानवांबरोबर युद्ध खेळण्यासाठी मंदिरा बाहेर पडले. देव-दानव युद्धात अंदाजे ९०० दानवांचे मुडदे पडले होते. यावेळी देव-दानव युद्धाचा थरार पाहणाऱ्यांचे भानच हरपले होते. दरम्यान, भानोबा देव गेल्यानंतर मूर्च्छित होऊन पडलेल्या व्यक्तींच्या अंगावरून देवाला आलेला घाम शिंपडला जातो आणि त्यांच्या कानात भानोबाचे चांगभले म्हटल्यावर ते शुद्धीवर येतात. यात्रेनिमित्त देवाचा अभिषेक, ओलांडा, पोवाडा, कुस्त्या, लोकनाट्य अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याने अवघा कुसेगाव परिसर भक्तिरसात चिंब झाला आहे.

भानोबा देवाची आख्यायिका

भानोबा देव हे खेड तालुक्यातील कोयाळी येथे दुष्काळ असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे आपली गुरे चरण्यासाठी गेले होते. दरम्यान तेथे रामोशी व मातंग समाज यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले होते. यात भानोबा देवाचा वध करण्यात आला होता. याचाच बदला म्हणून यात्रा काळात रामोशी व मातंग समाजांच्या लोकांचे भानोबा देवाच्या यात्रेच्या पालखी काळात मुडदे पडतात. यावेळी पडलेले व्यक्ती दोन तास बेशुद्ध असतात. भानोबा देवाचा घाम बेशुद्ध पडणाऱ्या व्यक्तीवर टाकून कानामध्ये भानोबाच चांगभले बोलत त्यांना शुद्धीवर आणले जात असल्याचे गावकरी सांगतात. यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, उपनिरीक्षक आर. घाडगे गोपनीय पोलीस सुजित जगताप, हवालदार संपत खबाले, संतोष मदने, काळे हे कुसेगाव येथे उपस्थित होते.

हही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये कांदा फक्त ८० पैसे किलो, 'हे' आहे कारण

Intro:Body:कुसेगाव मध्ये देव-दानव युद्धाचा थरार

दौंड

बोल भनोबाचा......चांगभलं....म्हणत महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातुन देवाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांनी श्री क्षेत्र कुसेगाव(ता.दौंड) येथे श्री भानोबा देवाचे मोठ्या भक्ती भावाने देवाचे दर्शन घेतले.श्री भानोबा देवाच्या गाव प्रदीक्षेणे वेळी देव-दानव युद्धा चा थरार यावेळी पहायला मिळाला . या युद्धात पहिल्या दिवशी 900 च्या आसपास मुडदे पडले होते.

श्री क्षेत्र कुसेगाव येथील श्री भानोबा देवाची यात्रा ही राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना परिचीत आहे.यात्रेतील देव–दानव युद्ध हे यात्रेचे खास आकर्षण असते .
श्री भानोबा देवाच्या यात्रेस आज सुरुवात झाली . या यात्रेच्या पहिल्या दिवशी राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी हजेरी लावली .
आज पहिल्या दिवशी ढोल ताशाच्या गजरात कोयाळीकर गजे पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले . यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भानोबा देव-दनावा बरोबर युद्ध खेळण्यासाठी मंदिरा बाहेर पडले . यावेळी देव दानव युद्धात अंदाजे 900 दानवांचे मुडदे पडले . देव- दानव युद्धाचा थरार पाहनार्यांच्या भान विसरायला लावणारा होता . मूर्च्छित होऊन पडलेल्या व्यक्तिंच्या अंगावरून भानोबा देव गेल्यानंतर देवाला आलेला घाम मूर्च्छित झालेल्या व्यक्तींवर शिंपडला जातो . आणि त्यांच्या कानात भानोबाच चांगभलं म्हणल्यावर ते पुन्हा शुद्धीवर येतात .

यात्रे निमित्त देवाचा अभिषेक, ओलांडा,पोवाडा,कुस्त्या,लोकनाट्य आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याने अवघा कुसेगाव परिसर भक्तिरसात चिंब झाला आहे.

भनोबा देवाची आख्यायिका ......

भानोबा देव हे (कोयाळी,ता.खेड) येथे दुष्काळ असल्यामुळे (मंगळवेढा जि. सोलापुर) येथे आपली गुरे चरण्यासाठी गेले असता तेथे रामोशी व मातंग समाज यांच्यामध्ये घनघोर युद्ध होऊन भानोबा देवाचा येथे वध करण्यात आला आहे असे जुनी वयोवृद्ध मंडळी सांगत आहेत. याचाच बदला म्हणून या यात्रा काळात रामोशी व मातंग समाजांच्या लोकांचे भानोबा देवाच्या यात्रेच्या पालखी काळात मुडदे पडतात.यावेळी पडणा-या व्यक्ती दोन तास बेशुद्ध पडत असते. यावेळी भानोबा देवाचा घाम बेशुद्ध पडणा-या व्यक्तिवर टाकुन कानामध्ये भानोबाच चांगभले बोलत बेशुद्ध व्यक्तीना शुद्धीवर आणले जाते.अशी माहिती ग्रामस्थांनी दिली

यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये साठी यवत पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील , उपनिरीक्षक आर . घाडगे
गोपनिय पोलीस सुजित जगताप , हवालदार संपत खबाले , संतोष मदने , काळे हे कुसेगाव येथे उपस्थित होते .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.