पुणे: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या पाहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, या निवडणुकी बद्दल मतदानापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्या. महा विकास आघाडीच्या उमेदवारचे काम शिवसेनेने मनापासून केले. मुख्यमंत्र्यांनीही बारकाईने लक्ष घातले. तीच गोष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या बाबतीत घडली. आम्हाला काही निवडून येण्यात कोणतीच अडचण वाटत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटीलसाहेब,गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटीलसाहेब, खासदार सुप्रियाताई सुळे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार वंदनाताई चव्हाण, उपस्थित राहणार असून यात शहरातील सर्वच मतदार संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी अजित पवार बोलत होते.