पुणे : यंदा 205 व्या शौर्य दिनानिमित्त (Shaurya Din Bhima Koregaon) राज्यभरातून लाखो भाविक हे भीमा कोरेगांव येथे दाखल झाले होते. विजयस्तंभाला अभिवादनासाठी मोठी गर्दी केली (205th Shaurya Din Bhima followers) होती. पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज (Why do Samata Senani duty) झाली होती. या सोहळ्यादरम्यान आज १ जानेवारी रोजी पहाटे धम्मयाचना, सकाळी भारतीय बौद्ध महसभा सामुदायिक बुद्ध वंदना करण्यात आली. त्यानंतर समता सैनिक दल (What is Samata Sainik Dal), महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडून सलामी व मानवंदना देण्यात आली.
सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन : समता सैनिक दलची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. २४ सप्टेंबर इ.स. १९२४ साली बाबासाहेबांनी महाडला एक परिषद भरविली होती. महाडच्या सत्याग्रहा पूर्वीची ही परिषद होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२७ चा काळ पाहता, चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन या महत्त्वाच्या घटना आहेत.
समता सैनिक दल म्हणजे काय : समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार होतच होते. सगळा समाज विषमतेत जळत होता. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक आता मान वर करू लागले होते. माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होते. सर्वांना हे आवडणे शक्य नव्हते, त्यांचा वर्चस्वाचा अहंकार दुखविला जाणे साहजिक होते, हे स्वाभिमानाचे नवे वारे सवर्ण समाजाला झोंबत होते आणि त्याचा परिणाम म्हणून गावा – गावात सवर्णांकडून अस्पृश्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समता सैनिक दलाची’ स्थापना केली होती. आणि आजही ही संघटना कार्यरत आहे.
का करतात समता सेनानी ड्युटी : दरवर्षी मोठ्या संख्येने या दलात राज्यातील विविध भागातून नागरिक सहभागी होऊन, प्रशासनाच्या बरोबरच भीमा कोरेगाव येथे विविध भागात आपल कर्तव्य बजावत असतात. यासंबंधी समता सैनिक दलातील अधिकारी पी एस ढोबळे यांच्याशी खास बातचीत केली आहे आमच्या ईटिव्ही भारतच्या प्रतिनिधींनी.