पुणे - जुन्नर तालुक्यात शिवसेनेच्या वतीने आमदार शरद सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी किल्ले शिवनेरीवर आपणच भगवा फडकवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी खासदार शिवाजी आढळराव यावेळी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद सोनवणे यांनी शक्ती प्रदर्शन रॅली काढली होती.
हेही वाचा एकनाथ खडसेंनी एबी फॉर्म नसतानाही भरला उमेदवारी अर्ज? 'हे' आहे कारण
याआधी शरद सोनवणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून निवडून आले होते. ते मनसेचे राज्यातील एकमेव आमदार होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी शिवबंधन बांधले. माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्या सोबत शरद सोनवणे यांनी शक्तीप्रदर्शन करून रॅली काढली.