पुणे - विधानसभा निवडणूक आम्ही महाआघाडीमध्ये समाविष्ट होऊन लढवली. या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करत होते आणि त्यांच्या नेतृत्वाला राज्यातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे भविष्यात महाआघाडीसाठी शरद पवारांचे नेतृत्वच सक्षम असल्याचे मत, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. तसेच त्यांच्यामुळेच राज्यातील अनेक भाग आम्ही भाजपमुक्त केल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी घेतली राज्यपालांची भेट
दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार यांच्या भेटीसाठी ते बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणूक लढविताना आम्ही महाआघाडीमध्ये समाविष्ट होऊन लढवली. या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या नेतृत्वाला राज्यातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्यातील अनेक भागातून आम्ही कमळ मुक्त करू शकलो आहे.
हेही वाचा - शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची मांदियाळी
आजची गर्दी पाहता भविष्यातील राजकीय समीकरणे सांगणारी आहे. त्यामुळे भविष्यात महाआघाडीसाठी शरद पवारांचे नेतृत्वच सक्षम आहे, त्याला पर्याय नाही. सत्तेसाठी दावा करणार्यांवर जनतेचा विश्वास नाही. या निवडणुकीत वेळ कमी पडला अन्यथा सत्ता परिवर्तन घडले असते. राज्यात बेरोजगारीसह शेतकर्यांचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही चोखपणे विरोधकांची भूमिका बजावणार आहे, असेही ते म्हणाले.