ETV Bharat / state

लस बाहेर पडल्यानंतर अदर पूनावालांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले हे अविरत मेहनतीचे फळ - अदर पुनावाला आनंद

केंद्र सरकारने लसीकरणाची परवानगी दिल्यानंतर, आज सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीचे डोस बाहेर पडले. आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस असून, गेल्या आठ ते नऊ महिन्यांच्या अथक मेहनतीचे हे फळ असल्याचे कंपनीेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.

Serum CEO Adar Poonawala expresses joy as trucks carrying vaccine doses leaves institute
लस बाहेर पडल्यानंतर अदर पूनावालांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले हे अविरत मेहनतीचे फळ
author img

By

Published : Jan 12, 2021, 5:12 PM IST

पुणे : केंद्र सरकारने लसीकरणाची परवानगी दिल्यानंतर, आज सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीचे डोस बाहेर पडले. आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस असून, गेल्या आठ ते नऊ महिन्यांच्या अथक मेहनतीचे हे फळ असल्याचे कंपनीेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.

१ कोटी डोस बाहेर..

पहिल्या टप्प्यामध्ये सरकारला आम्ही एक कोटी दहा लाख डोस दिले आहेत. तसेच, आणखी उत्पादन सुरू असून एकूण दहा कोटी डोस आम्ही सरकारला देणार असल्याचेही अदर यांनी सांगितले. सुरुवातीला सरकारला आम्ही २०० रुपये प्रति डोस या दराने आम्ही लस देत आहोत. दहा कोटी डोसेसनंतर आम्ही ही लस एक हजार रुपये प्रति डोस या बाजारभावाने विकू, असेही अदर यांनी स्पष्ट केले.

लसीचे साईड-इफेक्ट्स नाहीत..

लसीसंदर्भात कायम अफवा येत असतात, मात्र आमची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या लसीचे त्या-त्या रुग्णानुसार काही छोटे साईड इफेक्ट्स दिसतील; मात्र त्यात काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे अदर यावेळी म्हणाले. तसेच महिन्याला सहा ते सात कोटी डोस तयार करण्याची आपली क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : स्पुटनिक-५ : भारतातील दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी; तिसरा टप्पा लवकरच सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.