ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड : लघुशंका करण्यावरून हटकल्याने सुरक्षा रक्षकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवडमध्ये बीएमडब्ल्यूवर लघुशंका करत असलेल्या रिक्षाचालकाला सुरक्षारक्षकाने हटकले. यावरून रागाच्या भरात रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सुरक्षारक्षक 20 टक्के भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रिक्षाचालक कदमला अटक करण्यात आली आहे.

पुणे
पुणे
author img

By

Published : Nov 18, 2020, 12:12 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करत असताना हटकले म्हणून सुरक्षारक्षकाला रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भोसरी एमआयडीसी परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. शंकर भगवान वायफळकर (41) असे जखमी सुरक्षारक्षकाचे नाव असून महेंद्र बाळू कदम (31) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. आरोपीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

शंकर वायफळकर हे भोसरी एमआयडीसी परिसरातील बालाजी नगर येथे एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक आहेत. मंगळवारी त्यांनी रिक्षाचालक महेंद्र कदमला गेटजवळ उभ्या असलेल्या कंपनी मालकाच्या बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करताना पाहिले. तेव्हा त्यांनी कदमला हटकले. यावरून दोघांमध्ये किरोकोळ वाद झाला. त्यानंतर कदम तिथून रिक्षा घेऊन निघून गेला.

आरोपीला अटक -

लघुशंका करताना हटकल्यामुळे आरोपी कदमला शंकर यांच्याविषयी राग होता. तेव्हा पुन्हा आरोपी साडेचार वाजण्याच्या सुमारास कंपनी परिसरात पोहचला आणि बाटलीतून आणलेले पेट्रोल शंकर यांच्या अंगावर ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत शंकर वीस टक्के भाजले असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रिक्षाचालक कदमला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - पंजाब: कारची डिझेल टँकरला जोरदार धडक; आगीत पाच प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.