ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात पालखी मार्गावर जमाबंदीचे आदेश लागू - जिल्हाधिकारी

author img

By

Published : Jul 13, 2021, 5:03 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीसाठीच्या पालख्या बसने मार्गस्थ होणार आहे. पालखी मार्गावर गर्दी होऊ नये म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी पालखी मार्गावर जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

पुणे - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी देखील सोमवारी (दि. 19 जुलै) केवळ महाराष्ट्रातून दहा संतांच्या पादुका पंढरपूरला पालखी मार्गावरून शिवशाही बसने मार्गस्थ होणार आहेत. पालखी मार्गावर दर्शनासाठीची गर्दी टाळण्यासाठी कलम 144 म्हणजेच जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज संस्थान या चारच संस्थानांना पालखी मार्गावरून शिवशाही बसने पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, प्रत्येक पालखीसोबत दोन बस आणि निवडक 40 वारकऱ्यांना परवानगी असणार आहे. पालखी मार्गावर दर्शनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पालखी मार्गावरील गावांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. दरम्यान, या दिवशी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना, शासकीय सेवेतील वाहनांना, पासधारक वाहनांना या मार्गावरून प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर या मार्गावर पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केल्या आहेत.

हेही वाचा - धक्कादायक; बनावट नोटा बनवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, 32 लाखांच्या नोटा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.