पुणे - 10 जानेवारीपासून लसीच्या बूस्टर डोसला ( Booster Dose of Vaccine ) सुरुवात झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच लसीकरण केंद्रावर ( Vaccination Center ) बूस्टर डोस देण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र पुणे जिल्ह्यात जवळपास 18.50 लाख लोक हे दुसऱ्या डोस विणाच ( Pending Second Dose of 18.50 Lakh People ) असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ( Pune Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना दिली आहे. शिवाय महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीबाबत नागरिकांना आवाहन केले आहे.
- शहरासह ग्रामीण भागातही अनेक जणांचा दुसरा डोस प्रलंबित
संपूर्ण पुणे जिल्ह्याचा विचार करता सुमारे 18.50 लाख लोकांचा दुसरा डोस झालेला नाही. त्यात आरोग्य आणि अन्य विभागातील फ्रंटलाइन वर्कर मिळून ६६ हजार जणांनी हा दुसरा डोस घेतला नाही. त्यात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यातील आकडेवारी पाहता जवळपास २ लाख ९२ हजार ज्येष्ठ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
- 'या' वयोगटातील नागरिकांचे देखील दुसरे डोस नाहीच
दुसरा डोस शिल्लक असलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक प्रमाण आहे, ते १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे या वयोगटातील सुमारे १० लाख नागरिकांनी आपल्या लसीचा दुसरा डोस घेतलाच नाही. त्यातच ४५ ते ५९ या वयोगटातील नागरिकांचे प्रमाण देखील लाखात आहे. या वयोगटातील सुमारे ५ लाख जणांचा लसीचा दुसरा डोस शिल्लक आहे.
- पहिला डोस देखील मोठ्या प्रमाणात शिल्लक
पुणे, पिंपरी आणि पुणे ग्रामीणची आकडेवारी लक्षात घेता जवळपास ८०० फ्रंटलाइन वर्कर्सनी अद्याप आपला पहिला डोसच घेतला नाही. शिवाय इतर विभागातील आकडेवारी पाहता सुमारे १५ हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी आपला पहिलाच डोस घेतलेला नाही. पहिला डोस न घेतलेल्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण देखील मोठे आहे. जिल्ह्यातील जवळपास ५८ हजार नागरिकांनी आपल्या लसीचा पहिला डोसच घेतला नाही. एकूणच या सगळ्या आकडेवारीवर तसेच १८.५० लसीचे दुसरे डोस न घेणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - CORONA UPDATE : भारतात कोरोनाचे 1लाख 94 हजार 720 नवीन रुग्ण, मृत्यूची संख्या चिंताजनक