पुणे : बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे विद्यार्थिनींच्या सहलीच्या बसला अपघात झाला (School girl excursion bus accident) आहे. यात तीन मुली गंभीर तर चोवीस मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. शिर्डीवरून इचलकरंजीला परतीचा प्रवास करत असताना ही घटना घडली आहे. सागर क्लासेस, इचलकरंजी येथील 8 वी ते 10 वी क्लासच्या मुलींची सहल औरंगाबाद शिर्डी अशी आयोजित केली होती. शिर्डी येथून परत इचलकरंजी येथे जाताना यशोदा ट्रॅव्हल्सची बस बारामती पुढे पाहुणेवाडी गावच्या हद्दीत बस पुलावरून खाली गेल्यामुळे 24 मुली किरकोळ व 3 मुली गंभीर जखमी आहेत. एकूण 48 मुली व 5 स्टाफ मेंबेर होते. जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले (bus accident at Pahunewadi in Baramati taluka) आहे.
सहलीची बस दरीत कोसळली : 5 डिसेंबरला पेण येथून लोहगड सहलीसाठी गेलेल्या खासगी क्लासच्या बसचा (School girl excursion) भीषण अपघात झाला. लोहगड पर्यटन करून परत येताना दुधिवरे खिंडीजवळ एका अवघड वळणावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि बस 300 फूट दरीत कोसळली होती. केवळ दैव बलवत्तर म्हणून बसमधील 28 विद्यार्थी व 3 शिक्षक बालबाल बचावले होते. यांतील पाच विद्यार्थी जबर जखमी असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तीन बसमध्ये एकूण 88 विद्यार्थी होते. त्यापैकी MH06S9381 ह्या क्रमांकाच्या एका बसला अपघात झाला (bus accident ) होता.
एकूण 95 प्रवासी : पेण शहरातील साठे क्लासेसमधील 88 विद्यार्थी आणि 7 शिक्षक असे एकूण 95 जण मावळ तालुक्यातील लोहगड येथे खासगी बसने सहलीसाठी गेले होते. रविवार सुट्टी असल्याने दिवसभर किल्ले लोहगड परिसरात पर्यटन केले (School girl bus accident at Pahunewadi) होते. सायंकाळी पाचनंतर माघारी परत येताना बस क्रमांक MH06S9381 या बसला दुधिवरे खिंडीजवळ भीषण अपघात झाला होता. एका अवघड वळणावर बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्ता सोडून तब्बल तीनशे फूट खोल दरीत कोसळली होती. भीषण अपघात होऊनही केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी जीवितहानी टळली होती. याचवेळी लोहगड घेरेवाडी येथील स्थानिक तरुण, लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचावकार्य सुरू केले होते. पाच जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला (School girl excursion bus accident at Pahunewadi) होता.