ETV Bharat / state

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एनएसएस विद्यार्थ्यांकडून कोरोनाविरोधी अभियानात योगदान - Savitribai Phule Pune University NSS students

सध्याच्या कोरोना संसर्गाच्या आपत्तीच्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची यंत्रणेला मदत आणि सहकार्य व्हावे, या उद्देशाने कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्या पुढाकाराने विद्यापीठाने ‘कोविड १९ आपत्ती व्यवस्थापन अभियान’ सुरू केले आहे.

SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून कोरोनाविरोधी अभियानात योगदान
author img

By

Published : Apr 22, 2020, 11:41 PM IST

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रमांतर्गत ‘कोविड १९ आपत्ती व्यवस्थापन अभियान’ राबविण्यात येत असून, त्यात तब्बल ५३ हजार २३२ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ५.४३ लाख मास्क आणि ४८९० लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. याशिवाय २५ हजारांहून अधिक रक्तदात्यांची यादी तसेच १ लाख ४३ हजार कुटुंबांचे सर्वेक्षणही या विद्यार्थ्यांनी केले आहे.

सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्तीच्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची यंत्रणेला मदत आणि सहकार्य व्हावे, या उद्देशाने कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्या पुढाकाराने विद्यापीठाने ‘कोविड १९ आपत्ती व्यवस्थापन अभियान’ सुरू केले आहे.

विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील ५३ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. या विद्यार्थ्यांच्या मदतीने आतापर्यंत ५.४३ लाख कापडी मास्क आणि ४८९० लिटर सॅनिटायझरची निर्मिती करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज पडल्यास लगेचच रक्तदान करतील, अशा सुमारे २५ हजार ६४१ रक्तदात्यांची नोंदणी तयार करण्यात आली आहे.

याचबरोबर या विद्यार्थ्यांनी आताच्या संकटाच्या निमित्ताने सुमारे १ लाख ४३ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले आहे. ही सर्व माहिती विद्यापीठाने सुरू केलेल्या nss.unipune.ac.in या वेब-पोर्टलवर प्रसारित करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.