पुणे Sassoon Hospital Drug Racket : ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील यानं काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना पलायन केलं होतं. त्याच्या या पलायनानंतर ससून हॉस्पिटल तसेच प्रशासनावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात होती. अशातच आता ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नई इथून अटक करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांनी चेन्नईतून आवळल्या मुसक्या : ड्रग्ज माफिया ललित पाटील यानं ससून हॉस्पिटल इथून पलायन केल्यावर त्याच्या मार्गावर पुणे आणि मुंबई पोलिसांच्या विविध टीम होत्या. देशातील विविध भागात या टीम पाठवण्यात आल्या होत्या. ललित पाटील याची माहिती घेण्यात येत होती. अश्यातच मुंबई पोलिसांना पाटील हा चेन्नई इथं असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नई इथून अटक केलं आहे. मागच्याच आठवड्यात त्याचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली होती. आज ललित पाटील याला मुंबईत आणण्यात येणार आहे.
- ससून रुग्णालयातून केलं होत पलायन : ससून हॉस्पिटल इथं ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललीत पाटील यानं 2 ऑक्टोबर सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून पलायन केलं होत. गार्ड ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यानं पळ काढला होता. या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत एका अधिकाऱ्यासह 9 जणांचं तडकाफडकी निलंबन केलं होतं.
पोलीस प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्न : काही दिवसांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालय इथून पुणे पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ पकडले होते. या ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना त्यानं 2 ऑक्टोबर सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून पलायन केल्याचं समोर आलं होतं. रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास त्याला छातीचा एक्सरे काढण्यासाठी वार्ड क्रमांक 16 मधून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यावेळी ड्युटीवरील पोलीस गार्डच्या हाताला हिसका मारुन तो फरार झाला आहे. यानंतर ससून हॉस्पिटल तसेच पोलीस प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होतं. तसेच ललित पाटील पलायन प्रकरणात शिंदे गटाचा मंत्री सामील असल्याची टीकादेखील ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. आता ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नई इथून अटक केली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं आवळल्या मुसक्या : मुंबई पोलिसांनी चेन्नई इथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. लवकरच त्याला महाराष्ट्रात आणलं जाणार असून कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्याला पकडण्यासाठी दहा पथकं तयार करण्यात आली होती. ललित पाटील हा चेन्नई इथं लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं चेन्नई गाठून सापळा रचला. ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्यानं ड्रग्ज प्रकरणातील अनेक बड्या धेंडांची नावं बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :