ETV Bharat / state

Sassoon Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या घरातून पोलिसांनी जप्त केलं 3 किलो सोनं; नाशिकमधील घरी झाडाझडती - ललित पाटील याच्या घरातून 3 किलो सोनं

Sassoon Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या घरातून पोलिसांनी तब्बल 3 किलो सोनं जप्त केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ललितनं अमली पदार्थांची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशानं सोनं विकत घेतल्याचा पोलिसांना संशय आहे.

Sassoon Drug Case
ड्रग्ज माफिया ललित पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 11:36 AM IST

Updated : Oct 13, 2023, 3:31 PM IST

पुणे Sassoon Drug Case : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून गेल्यानं मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याच्या साथीदाराला पुणे पोलिसांच्या पथकानं नेपाळ बॉर्डरवरुन ताब्यात घेतलं. आता पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या घराची झाडाझडती सुरू केली असता, त्याच्या घरातून 3 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. ड्रग तस्कर ललित पाटील याच्या घरातून 3 किलो सोनं आढळल्यानं पोलिसांनी ललित पाटीलच्या इतर मालमत्तांची झाडाझडती सुरू केली आहे.

  • ड्रग विक्रीच्या पैशातून सोनं खरेदी : ललित आणि भूषण पाटील यांनी अमली पदार्थांच्या विक्रीतून आलेल्या पैशातून मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करून ठेवल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी ललित पाटील याच्या नाशिक येथे घराची झडती घेतली. यावेळी पोलिसांच्या हाती तीन किलोहून अधिक सोनं सापडलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अमली पदार्थांच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा पोलिसांना संशय : पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत. पुणे पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरुन भूषण आणि अभिषेक या दोघांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक इथल्या घरातून पोलिसांनी हे सोनं जप्त केलं आहे. दरम्यान, कोर्टात पोलिसांनी संशय व्यक्त करताना ड्रगच्या आलेल्या पैशातून त्यांनी स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं म्हटलं होतं. एका दिवसातच पोलिसांच्या हाती अवैध मार्गातून मिळविलेल्या पैशातून पाटील बंधूनं मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केल्याचं आता समोर आलं आहे.

अभिषेकही ड्रग निर्मिती करून विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी : ललित पाटील आणि भूषणसोबत अभिषेक देखील ड्रग निर्मिती करुन विक्री करण्याच्या रॅकेटमध्ये सहभागी होता. अभिषेक हा भूषण याचा मित्र असून तो अभियंता आहे. त्याच्यासोबत काम करत असल्यामुळे या दोघांच्या अमली पदार्थ निर्मिती आणि विक्रीची त्याला माहिती होती. अनेकदा त्यातून आलेले पैसे तो हाताळत होता.

मेफेड्रोनचा फॉर्म्यूला विक्री करण्याच्या तयारीत : महत्त्वाची बाब म्हणजे ललित पाटील हा ड्रग विक्रीचं नेटवर्क सांभाळत होता. तर भूषण हा केमिकल अभियंता असल्यामुळे त्याला मेफेड्रोन ड्रग तयार करण्याचा फॉर्म्यूला माहिती होता. ड्रग विक्री बरोबरच लतिल मेफेड्रोन तयार कण्याचा फॉर्म्यूला विक्री करण्याच्या तयारीत होता. मोठी रक्कम घेऊन तो मुंबईच्या काही लोकांना प्रशिक्षण देखील देणार होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ललित पाटील, अभिषेक बलकवडेसोबत महिला : ससून हॉस्पिटलमधून ड्रग्स तस्कर ललित पाटील पळून गेल्यानंतर त्यानं केलेल्या विविध घटना आता समोर येत आहेत. पुण्यातील एका ठिकाणचा धक्कादायक व्हिडिओ आता या प्रकरणात समोर आलेला आहे. यामध्ये ललित पाटील आणि अभिषेक बलकवडे हे बोलताना दिसत असून, या ठिकाणी एक महिला सुद्धा थोड्यावेळानं आलेली दिसत आहे. त्या महिलेनं सुद्धा ललित पाटलाशी संवाद साधल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर अभिजीत बलकवडे आणि ती महिला आत गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Dada Bhuse Lalit Patil Photo : ड्रग्ज माफिया ललित पाटीलसोबत मंत्री दादा भुसेंचा फोटो व्हायरल; सुषमा अंधारे म्हणाल्या...
  2. Sassoon Drugs Racket : ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटीलचा भाऊ नेपाळ बॉर्डरहून ताब्यात

Last Updated : Oct 13, 2023, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.