पुणे - शहरात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, या महामारीपासून सुटका होण्यासाठी शहरातील तळजाई देवीला साकडे घालण्यात आले आहे. या कोरोनाचा वध लवकर होण्याचे साकडे घालण्याकरिता सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचे प्रतिकात्मक छायाचित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आले आहे. सरसेनापती हंबीरराव या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनही या माध्यमातून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि पुणे शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. यामुळे सगळीकडे नैराश्याचा वातावरण आहे. हे नैराश्याचे वातावरण कमी करण्यासाठी सरसेनापती हंबीरराव टीम कढून हे देवीला साकडे घालण्यात आले असल्याची माहिती निर्माते संदीप मोहिते यांनी दिली.
दार उघड बये ...दार उघड-
पुणे शहरात दिवसंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहे. कोरोनाचा वध लवकरात लवकर व्हावा यासाठी रांगोळीकार मयूर दुधाळ आणि त्यांच्या सहकारी यांनी पुण्यातील तळजाई माता मंदिराबाहेर सरसेनापती हंबीरराव यांची रांगोळी साकारली आहे. तळजाई मंदिराबाहेर काढण्यात आलेल्या या रांगोळीतून देवीला "कोरोनासुराचा"वध करण्यासाठी.. दार उघड बये ...दार उघड' अेस साकडे घालण्यात आले आहे. ही रांगोळी मयूर दुधाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही रांगोळी साकारली आहे. नागरिकांना पाहण्यासाठी 16 तारखेपर्यंत संधी राहणार आहे.
१२ तासात १०० किलोची रांगोळी-
या रांगोळीसाठी तब्बल १२ तासांचा वेळ देण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून रांगोळी काढायला सुरुवात करण्यात आली होती ते रात्री ७ लाही रांगोळी पूर्ण झाली आहे. यासाठी १० कलाकारांनी कष्ट घेतले आहेत. तर हे संपूर्ण चित्र रेखाटेपर्यंत सुमारे ९० किलो ते १०० किलो रांगोळीचा वापर झाला आहे.