पुणे : संजय राऊत यांनी सीमा प्रश्नाबाबत केलेल्या विधाना बाबत देसाई यांना विचारले (Shiv Sena leader Sanjay Raut) असता ते म्हणाले की आम्ही (Shinde Fadnavis Govt) संजय राऊत यांना महत्त्व देत नाही. तुम्हीही जास्त त्यांना महत्त्व देऊ नका. आत्ता सक्तीचा आराम करून एक महिना झाला आहे ते बाहेर आले आहेत. ते अंधारात तीर मारण्याचा काम करत आहे. (Sanjay Raut was in hiding) माझा राऊत यांना प्रश्न आहे की त्यांनी सांगावे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना किती वेळा सीमा प्रश्नाबाबत ते दिल्लीला गेले. (Shambhuraje Desai On Sanjau Raut) किती चर्चा केली, याचे उत्तर राऊत यांनी द्यावे असे यावेळी देसाई म्हणाले.
आमचे 170 ते 175 जागांचे बहुमत : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्चपदी बसवाव अस विधान केल आहे. यावर मंत्री शंभुराजे देसाई यांना विचारलं असता ते म्हणाले की आमचे 170 ते 175 जागांचे बहुमत आहे. तो 200 च्या पुढे कसे जाईल यासाठी आम्ही दोन्ही पक्ष प्रयत्न करणार आहे. येणारी लोकसभा आणि विधानसभा बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित लढणार आहे.आणि कालच फडणवीस यांनी सांगितल आहे की येणाऱ्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे.बावनकुळे काय बोलले हे मी ऐकल नाही.आज संध्याकाळी मी नागपूरला जाणार आहे आणि मग त्यांच्याशी चर्चा करणार आहे. असे यावेळी देसाई यांनी सांगितले. तसेच 2024 ला आम्ही बहुमतात येणार आहे आणि मगच एकत्रित येऊन ठरवू का पुढचा मुख्यमंत्री कोण होणार आहे. आत्ताच याबाबत काहीही बोलणे झालेले नाही असे देखील यावेळी देसाई यांनी सांगितले.
सुषमा अंधारेंचाही घेतला समाचार : बेळगांवला कधी जाणार याबाबत देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, अधिवेशन झाल्यावर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील यंच्याशी चर्चा करू आणि बेळगावमध्ये कधी जायचे हे ठरवू असे देखील यावेळी देसाई यांनी सांगितले. सुषमा अंधारे यांनी जे विधान केले आहे त्याबाबत देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, वारकरी संप्रदायबद्दल ठेच पोहचवणे असे वक्तव्य आहे. उद्धव ठाकरे सुषमा अंधारे यांच्यावर का नाही कारवाई करत नाही. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे नंतर सुषमा अंधारे यांना महत्त्व मिळाले आहे. संजय राऊत यांना ओव्हरटेक करुन त्या पुढे गेल्या आहेत.म्हणून उद्धव ठाकरे कारवाई करत नाही अस वाटत आहे अस यावेळी देसाई म्हणाले.