पुणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला माझ्या हत्येची सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
राऊत बिनडोक माणूस : यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका केली आहे. ते, म्हणाले की संजय राऊत बिनडोक माणूस आहे. केवळ प्रसिध्दी करता ते असे विधान करत आहे, अशी जोरदार टिका म्हस्के यांनी केली आहे. पुण्यातील शिवसेना भवन येथे शिवसेनेचे प्रवक्ते निलेश म्हस्के यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
चौकशी झाली पाहिजे : यावेळी म्हस्के म्हणाले की काल संजय राऊत यांनी जे विधान केले आहे. त्यावर पोलिस त्यांच्याकडे गेले होते. त्यांनी काही पुरावे असतील तर द्या अस सांगितलं होत. तेव्हा ते म्हणत आहे की माझ्या अंगावर शाही फेकणार आहे. ज्यांनी त्यांना माहिती दिली आहे. त्यांची चौकशी झाली पाहिजे असे, देखील यावेळी म्हस्के म्हणाले.
शिवसेनेच्या दशेला संजय राऊत जबाबदार : आज शिवसेनेचीजी दशा झाली आहे. त्याला सर्वस्वी संजय राऊत हे जबाबदार आहे.त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा संताप आहे. शिवसेना संपवण्याची सुपारी ही राष्ट्रवादी काँग्रेसने संजय राऊत यांना दिली होती, असे स्पष्ठ आरोप यावेळी म्हस्के यांनी राऊत यांच्यावर केले आहे.
अनेक नेते आमच्या संपर्कात : आज पुणे शहरातील ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेते हे आमच्या संपर्कात असून लवकरच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने 24 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे, असे यावेळी म्हस्के म्हणाले.
हेही वाचा - Shinde vs Thackeray Live Update : सत्तासंघर्षावरची आजची सुनावणी संपली