ETV Bharat / state

Sanjay Kakde on Girish Bapat : गिरीश बापट हे स्वखुशीने प्रचारात आले- संजय काकडे - भारतीय जनता पक्ष

पुण्याचे खासदार गिरीश बापट हे व्हेटिंलेटरवर आणि ऑक्सिजनवर असताना सुद्धा प्रचारात सहभागी झाले. त्यामुळे भाजपावर टीका होत असतानाच त्यांच्यावर कोणीही दबाव आणला नाही, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केले. ते स्वखुशीने सहभागी झाले. देवेंद्र फडणवीस भेटून गेले आणि ते आले हा फक्त योगायोग आहे. कावळा उडायला अन् फांदी तुटायला जसा संबंध असतो तसाच संबंध आहे, असे म्हणत माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी गिरीश बापट यांच्या सहभागाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Statement by Sanjay Kakade
संजय काकडे यांचे वक्तव्य
author img

By

Published : Feb 17, 2023, 3:35 PM IST

गिरीश बापट यांना राजकारणाची खुजली

पुणे: संजय काकडे म्हणाले की, विरोधकाची कीव येते 1968 सालापासून बापट हे प्रचार यंत्रणेत सहभागी आहेत. 55 वर्षे झाले बापट हे राजकारणात आहेत. घोडा किती म्हातारा झाला तरी पळतो. सिंह कितीही म्हातारा झाला तरी मांस खातो. बापट यांच्या हृदयामध्ये, मनामध्ये, डोक्यामध्ये, मेंदूमध्ये राजकारणाची खुजली आहे. स्वखुशीने भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आलेले आहे. कुणीही दबाव कुणीही प्रेशर त्यांच्यावर दिलेले नाही. त्यांना जो त्रास होतो तो शंभर टक्के होतो. असा त्रासातूनही आम्ही त्यांना मानतो. त्यांनी आम्हाला सांगितले की, आम्हाला मला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात उतरायचे आहे. त्यांच्यामुळे आमच्या सगळ्या तरुण ते वयस्कर कार्यकर्त्यांमध्ये एक जोश आणि उत्साह निर्माण झाला.

पक्षाची एवढी वाईट अवस्था नाही: कधी ते जाऊन रुग्णालयात दाखल होतात, तर कधी बाहेर फिरतात. मला स्वतः ते आठ दिवसापूर्वी माझ्या ऑफिसला भेटायला आलेले होते. त्यांच्या प्रकृतीमुळे बदल होत असल्यामुळे कदाचित दोन दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केले होते की, मी प्रचार सभेत सहभागी होणार नाही. पण तब्येत बदलली असेल त्यामुळे ते सहभागी झालेत. त्यांच्यावर कुठलाही दबाव पक्षाने घातलेला नाही. भारतीय जनता पक्षाची एवढी वाईट अवस्था नाही की, कुणाच्या आजार पणाचा फायदा आपण घ्यावा. आठ दिवसापूर्वी स्वतः बापट हे माझ्या ऑफिसमध्ये आल्याचे माझी खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

रुग्णालयात जाऊन बापट यांची भेट: खासदार बापट हे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना श्वसनाचा त्रास आहे. ते आजारी असल्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि महिन्याभरात संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे संसदेत भेटू, अशा शब्दांत पवार यांनी बापट यांना धीर दिला होता.

अचानक बापट कार्यालयात दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद : खासदार बापट हे आजारी पडल्यानंतर काल पहिल्यांदाच सुमारे दीड महिन्यानंतर कसबा कार्यालयात आले होते. ते कार्यालयात येणार याची कुणालाच कल्पना नव्हती. ती नेहमीप्रमाणे जसे कार्यालयात यायचे आणि ज्या ठिकाणी बसायचे तिथे येऊन बसले होते. दरम्यान, अचानक बापट कार्यालयात दिसल्याने कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला होता.

हेही वाचा: MP Girish Bapat Entered Kasaba खासदार गिरीश बापट कसब्यात दाखल कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भेटण्यासाठी मोठी गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.