पुणे - पक्षाकडून अनेकजण इच्छुक होते. त्यामध्ये जुन्या आणि तळागाळातून आलेल्यांना उमेदवारी देण्याच्या हेतूने पक्षाने माझी उमेदवारी वगळली. मला दिल्लीत जाण्याची इच्छा नाही. महाराष्ट्रात राहून काम करण्यास पसंती आहे. त्यामुळे उमेदवारी वगळल्याचे दु:ख नाही. मात्र, एकनाथ खडसे यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असे संजय काकडे म्हणाले. भाजपने त्यांची राज्यसभेची उमेदवारी वगळल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
मी भाजपमध्ये असल्याने देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वच योग्य वाटत होते, असेही काकडे म्हणाले. अजित पवार की देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व योग्य? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. भविष्यात योग्य त्याठिकाणी पुनर्वसन केले जाणार आहे, असे पक्षाने सांगितले असल्याचेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -
- माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय लवकरच घेईन.
- महाराष्ट्रासाठी काम करायचे असेल तर महाराष्ट्रात राहावे लागेल.
- मी महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीसांकडे व्यक्त केली होती.
- मला राज्यातच अभिरूची आहे. मी राज्यात काम करण्यासाठी इच्छूक.
- मला संघर्ष करायला आवडतो. त्यामुळे आम्ही परत सत्ता आणू
- मध्यप्रदेशातील कोरोना महाराष्ट्रात येणारच नाही, असे नाहीच. थोडे अवघड आहे. पण अशक्य आहे
- भाजपच्या नेते मुनगंटीवारांनी आमची चूक लक्षात आल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत, तर त्यांनी कोणत्या चुका आहेत ते समोर आणावे, असेही ते म्हणाले. भाजपची चूक मान्य असल्याने शिवसेना पुन्हा येईल.
- पवार साहेंबाशी मी वैयक्तीक कामासाठी भेटलो होतो.
- भाजप उदयनराजेंना दिलेल्या शब्दाला जागली म्हणून उदयनराजेंना संधी.