ETV Bharat / state

कधी सुधारणार.... पिंपरी-चिंचवडमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या १०० जणांना लाठ्यांचा प्रसाद - पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. अवघ्या देशात संचारबंदी आणि जमावबंदी असून नागरिक मात्र सुधारण्याचे काही नाव घेत नाहीत.

PCMC
पिंपरी-चिंचवडमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या १०० जणांना लाठ्यांचा प्रसाद
author img

By

Published : Apr 20, 2020, 1:21 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्द ही कंटेंमेंट झोन म्हणून घोषित केलेली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेतला आहे. परंतु, नागरिक मात्र काही सुधारण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील ९४ जणांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले तर इतर व्यक्तींवर १८८ नुसार कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या १०० जणांना लाठ्यांचा प्रसाद

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. अवघ्या देशात संचारबंदी आणि जमावबंदी असून नागरिक मात्र सुधारण्याचे काही नाव घेत नाहीत. कधी कवायत, कोंबडा तर उठाबशा ही पोलिसांनी नागरिकांना करायला लावल्या. परंतु, नागरिक मात्र बिनधास्त फिरताना दिसत आहेत.

आज देखील सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात शंभर व्यक्तींना मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांना एका ठिकाणी बसवले. यातील काहींना लाठ्यांचा प्रसाद दिला. तर काहीजणांना समजावून सांगितले. यातील काहीजणांवर १८८ नुसार कारवाई करण्यात आली, तर बाकीच्या व्यक्तींना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले आहे. कोरोनाचा फास घट्ट आवळतोय हे नागरिकांच्या लक्षात येत नाही की, कोरोना विषाणूला काही मुठभर व्यक्ती फार मनावर घेत नसल्याचे वारंवार दिसत आहे. त्यांना पोलिसांनी अद्दल घडवणे महत्वाचे असून इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार या मुठभर लोकांना नाही. सदरची कारवाई ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.