पुणे : महाविकास आघाडी सरकार 17 तारखेला महामोर्चा काढणार आहे. या महामोर्चाला संभाजी ब्रिगेडने सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शवण्याचा निर्णय घेतला (Sambhaji Brigade participating in MVA March) आहे. काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झालेली आहे. पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेऊन सर्वपक्षीय मोर्चा काढला. त्याला प्रतिसाद सुद्धा मिळाला आणि पुणे कडकडीत बंद पाळण्यात आला.
महापुरुषांचा अपमान : जातीवादी लोकांकडून महापुरुषांचा अपमान केला जात (MVA March In Pune) आहे. हे एक प्रकारचे षडयंत्र आहे. या षडयंत्र विरोधात बोलणाऱ्यासाठी परवानगी नाकारली जात आहे. परंतु आमच्या अस्तित्वासाठी आमच्या सन्मानासाठी महापुरुषांच्या कर्तृत्वासाठी आम्ही मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी होऊ, तसे आदेश आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना दिले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिलेली (controversial statement against shivaji maharaj) आहे.
अस्तित्वाची, सन्मानाची लढाई : महापुरुषांची बदनामी करणाऱ्या वाचाळवीरांच्या विरोधात, राज्यपालांचा राजीनामा घेण्यासाठी, महाराष्ट्रातून हाकालपट्टी करण्यासाठी, महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरच्या मुंबईतील मोर्चाला, 'संभाजी ब्रिगेड' हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातून सहभागी होणार (controversial statement against shivaji maharaj) आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री महोदय, परवानगी द्या, किंवा देऊ नका. मोर्चा तर संविधानिक पद्धतीने होणारच आहे. आमच्या अस्तित्वाची, सन्मानाची लढाई आम्ही ताकतीने लढणार असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने जाहीर केली (March against governor controversial statement) आहे.