ETV Bharat / state

Rohit Pawar Question: राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यावर असंतोष का ? रोहित पवारांचा सवाल - रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar Question: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींचा कोणता दाखला या विषयी दिला. हे मला माहित नाही. परंतु अशा विषयात राजकारण करण्यात कोणाचेच हित नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar Question
Rohit Pawar Question
author img

By

Published : Nov 19, 2022, 4:55 PM IST

बारामती : सावरकर यांच्याविषयी माझा फारसा अभ्यास नाही. परंतु या प्रकरणी सर्वपक्षीयांसह विचारवंतांनी एका व्यासपीठावर येत चर्चा घडवून आणावी. खरा इतिहास जनतेसमोर आणावा. सावरकरांच्या विषयात मी राजकारण बाजूला ठेवून राहूल गांधी यांना दाखवलेले पत्र, सावरकर यांचे लिखान समजून घेतले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींचा कोणता दाखला या विषयी दिला. हे मला माहित नाही. परंतु अशा विषयात राजकारण करण्यात कोणाचेच हित नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.

अडचणीत आणण्यासाठी: राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी राज्यपालांनी अवमानजनक वक्तव्य केले होते. हर हर महादेव चित्रपटात शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवला गेला, कर्नाटकात छत्रपतींच्या पुतळ्याचा अवमान झाला, तेव्हा गप्प असणारी मंडळी सध्या सावरकरांच्या विषयावरून रणकंदन माजवत आहेत. काॅंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात दरी पाडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी या मुद्द्याचा वापर होत असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

आत्ताच असंतोष का : काॅंग्रेस नेते राहूल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून विविध मुद्दे पुढे आले आहेत. सुरुवातीला टिकलीचे प्रकरण निघाले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एका मंत्र्याने अवमानजनक वक्तव्य केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. त्यानंतर दुसरी केस त्यांच्यावर टाकली गेली. खासदार राऊत यांचा जामिन रद्द व्हावा. यासाठी न्यायालयात धाव घेतली गेली. हे सगळे मुद्दे महाराष्ट्रात यात्रा असतानाच का निघाले ? असा सवाल आमदार पवार यांनी केला. यात्रेला मिळणारा प्रतिसाद लोकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात असल्याचा प्रश्न मलाच नव्हे तर लोकांनाही पडू लागल्याचे आमदार पवार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.