ETV Bharat / state

'हा तर सत्य आणि विकासाचा विजय'

'दिल्लीमध्ये प्रचारात भाजपने १२ मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता. मात्र, तरीही दिल्लीच्या लोकांनी आप पक्षाला साथ दिली हे खूप अभिनंदनीय आहे,' असे रोहित पवार म्हणाले.

rohit pawar
'हा तर सत्य आणि विकासाचा विजय'
author img

By

Published : Feb 11, 2020, 5:14 PM IST

Updated : Feb 11, 2020, 6:09 PM IST

पुणे - अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण, आरोग्यासारख्या क्षेत्रात प्राध्यान्याने काम केल्याने जनतेने त्यांना पुन्हा स्वीकारले, अशी प्रतिक्रिया दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली. हा विजय सत्य आणि विकासाचा असल्याचेही ते म्हणाले.

'हा तर सत्य आणि विकासाचा विजय'

हेही वाचा - 'दिल्लीत नव्या राजकारणाला सुरूवात'; केजरीवालांनी नागरिकांचे मानले आभार

दिल्लीतील विकासकामांची स्वत: पाहणी केल्याची आठवणदेखील त्यांनी यावेळी सांगितली. 'दिल्लीमध्ये प्रचारात भाजपने १२ मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता. मात्र, तरीही दिल्लीच्या लोकांनी आप पक्षाला साथ दिली हे खूप अभिनंदनीय आहे,' असे ते म्हणाले.

हेही वाचा - 'दिल्लीकरांनी भाजपच्या अहंकाराचा पराभव केला, पराभवाची मालिका आता थांबणार नाही'

लोकसभा निवडणुकीत भाजपने भावनिक मुद्द्यांवर हात घातल्याने त्यांना विजय मिळाला. असे असले तरी स्थानिक पातळीवर जनता भावनिक राजकारणाला प्राध्यान्य देत नाही, हे या निकालावरून दिसून येत असल्याचे पवार म्हणाले. आगामी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र लढल्यास भाजपचा पराभव होऊ शकतो, असे भाकितही त्यांनी वर्तवले.

Intro:दिल्लीचा विजय हा सत्याचा आणि विकासाचा विजय आहे, आमदार रोहित पवार

Body:mh_pun_01_rohit_pawar_on_dilli_avb_7201348

anchor
दिल्लीमध्ये सत्याचा, विकासाचा विजय झाला आहे, अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण, आरोग्य अशा लोकांच्या समस्यांना प्राधान्य देत या क्षेत्रात चांगले काम केले त्याला लोकांनी स्वीकारले असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार मांडले..दिल्ली मध्ये झालेल्या विकास कामांची पाहणी दिल्लीत जाऊन केली होती असे सांगत लोकांनी विकासाला मत दिले असल्याचे रोहित पवार म्हणाले ते पुण्यात बोलत होते... दिल्ली मध्ये प्रचारात भाजपने 12 मुख्यमंत्री स्वतः केंद्रीय गृहमंत्री असा मोठा फौज फाटा तिथे तैनात केला होता मात्र दिल्लीच्या लोकांनी आप पक्षाला साथ दिली हे खूप अभिनंदनीय आहे, लोकसभा निवडणुकीत भाजपने भावनिक विषय घेत भावनेला हात घातला होता त्यामुळे त्यावेळी भाजपला संधी मिळाली मात्र स्थानिक पातळीवर लोकांनां आपली कामे झालेले पहायचे असते भावनिक राजकारणाला स्थानिक पातळीवर लोक प्राधान्य देत नाही हे
यातून पुन्हा दिसून येतंय आता आगामी निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेश च्या निवडणुका आहेत आता त्या ठिकाणी भाजप काय करणार हे आता सांगता येणार नाही मात्र पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेश च्या निवडणूक आहेत आता त्या ठिकाणी भाजप काय करणार हे आता सांगता येणार नाही मात्र पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मध्ये सर्व जण एक होऊन लढले तर भाजपचा प्राभव होऊ शकतो महाराष्ट्रात आम्ही वेगळ्या विचाराचे पक्ष एकत्र आलो आणि भाजपला दूर ठेवले महाराष्ट्राने उदाहरण दिले आहे ते पुढे ठेवून तशा प्रकारे या ही राज्यात हे होऊ शकते
byte रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

Conclusion:
Last Updated : Feb 11, 2020, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.