पुणे - औंधच्या परिहार चौकातील नाकोडा ज्वेलर्समध्ये गुरूवारी पहाटे दरोडा पडला. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील दागिने लंपास केले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली.
हेही वाचा - मुंबईत तब्बल ७३ कोटींच्या भूगर्भातील पाण्याची चोरी, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि डॉगस्कॉड घटनास्थळी दाखल झाले. किती ऐवज चोरीला गेला हे पंचनामा केल्याशिवाय सांगता येणार नाही, असे पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले. मात्र, अंदाजे 15 ते 20 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती नाकोडा ज्वेलर्सचे मालक मनीष सोनिगरा यांनी दिली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.