ETV Bharat / state

आंबेगाव विधानसभा: वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्याला आढळराव पाटील देणार का धक्का? - शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातही तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. विद्यामान राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार दिलिप वळसे पाटील यांच्या विरोधात लोकसभेला पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघ
author img

By

Published : Sep 8, 2019, 4:37 PM IST

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षाने आपापले गड शाबूत राखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यावेळी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातही तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. विद्यामान राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार दिलिप वळसे पाटील यांच्या विरोधात लोकसभेला पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आंबेगाव मतदार संघातून लोकसभेला आढळराव तर विधानसभेला वळसे पाटील हे समीकरण मतदारांनी कायम केलं होतं. मात्र, सध्याच्या लोकसभा निवडणुकीत ही सोटे लोट्याची राजकीय समीकरणं मतदारांनीच बदलली. डॉ. अमोल कोल्हेंना आंबेगाव तालुक्याने सर्वाधिक मताधिक्य मिळवून देत आढळराव पाटलांचा चौकार आडवला आणि कोल्हेंना खासदार केले. त्यामुळे या मतदारसंघाची राज्यात मोठी चर्चा रंगली.

वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्याला आढळराव पाटील देणार का धक्का?

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे-पाटील विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून लोकसभेला पराभूत झालेले आढळराव पाटील स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य उभा राहण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याने दिलीप वळसे पाटलांची कन्या पुर्वा वळसे पाटील यांनाही संधी मिळणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. मात्र, यावेळी पुन्हा वळसे पाटीलच स्वत: निवडणूक लढणार असल्याचं त्यांनीच स्पष्ट केले आहे.

मतदारसंघात वळसे पाटलांचे वर्चस्व
आंबेगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटलांचे वर्चस्व आहे. 1990 ते 2019 या 29 वर्षाच्या कालखंडात वळसे पाटील आमदार राहिले आहेत. सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर शरद पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातून मिळून सलग ६ वेळा ते आमदार राहिले आहेत. आता पुन्हा सातव्यांदा या मतदारसंघावर वळसे पाटील यांनी हक्क सांगत समोरुन कोणीही असो पुन्हा एकदा विजय राष्ट्रवादी कॉग्रेसचाच होणार असल्याचे सांगितले आहे.

ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष
पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन बाजुला आंबेगाव विधानसभा मतदारसंघ पसरला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या संख्येने आदिवासी समाज मतदार आहे. तर पुर्व भागात शेतकरी आहेत. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची संजीवनी देणारे डिंभा धरण वळसे पाटलांच्या पुढाकाराने उभारले आहे. एकेकाळी दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या आंबेगावचा कायापालट झाला. घोडेगाव व मंचर ही या तालुक्यातील महत्वाची शहरं आहेत. ग्रामीण भागात शहरीकरण वाढत असताना इथे विकास मात्र होताना दिसत नाही. पाणी टंचाई, रस्त्यांची झालेली चाळण, गावखेड्यांत होणारे अपघात, सातगाव पठार येथील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची समस्या अशा अनेक समस्या आजही कायम आहेत. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या मनात दोन्ही पाटलांबद्दल नाराजीचा सुर पहायला मिळत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून सलग ३ वेळेस आढराव पाटील विजयी झाले होते. आढळराव पाटील केंद्रात तर वळसेपाटील राज्यात असं यामागचं राजकीय समीकरण राहिलं आहे. मात्र, शिरुर लोकसभेतून आढळराव पाटलांनी थेट पवारांना आव्हान दिले होते. त्यानंतर शरद पवारांनी अमोल कोल्हेंचे शिवबंधन तोडून त्यांच्या मनगटात घड्याळ घातलं आणि शिरूर लोकसभेची निवडणूक कोल्हेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली. यामध्ये आढळराव पाटलांचा कोल्हेंना पराभव केला.

शिरुर लोकसभेतला डॉ. अमोल कोल्हेंचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय नसून संभाजी महाराजांच्या मालिकेचा विजय असल्याचे आढळराव पाटील यांनी म्हटले होते. त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघातून 25 हजार 697 मतांची आघाडी राष्ट्रवादीला मिळाली. परिणामी भूमिपुत्र शिवाजी आढळरावांचा चौकार गडातच रोखला गेला. मात्र, हाच पराभव आढळराव पाटलांच्या जिव्हारी लागला आहे. ते आता विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तयारीला लागले आहेत. लोकसभेच्या पराभवाची सल दूर करण्यासाठी स्वतः आढळराव पाटील हे वळसे-पाटलांसोबत दोन हात करण्याची शक्यता आहे. तसं झालंच नाही तर आढळरावांच्या पत्नी कल्पना दुसऱ्यांदा अथवा मुलगा अक्षय पहिल्यांदा नशीब अजमावू शकतात. त्यांच्या विरोधात दिलीप वळसे पाटील हे स्वत: सातव्यांदा निवडणूक लढवू शकतात. किंवा त्यांच्या कन्या पुर्वा वळसे पाटील या पहिल्यांदा आपलं नाशिब आजमावू शकतात.

2019 ला शिरूर लोकसभेतील आंबेगाव विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मते

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 1,07,781 (विजयी)
शिवाजीराव आढळराव (शिवसेना) - 82,084

आंबेगाव विधानसभा 2014
दिलीप वळसे-पाटील, (राष्ट्रवादी) 1 लाख 20 हजार 235 (विजयी)
अरुण गिरे (शिवसेना)-62 हजार 081

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.