ETV Bharat / state

पुण्यातील ससूनच्या डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा, जास्त वर्कलोड असल्याची तक्रार

author img

By

Published : Apr 5, 2021, 11:05 AM IST

Updated : Apr 5, 2021, 1:22 PM IST

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. पुण्यातील ससून रूग्णालयामध्ये कोविड रूग्णांचा भार शिकाऊ निवासी डॉक्टरांवर दिला जात आहे. त्यामुळे या डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

Sassoon Hospital Resident doctors warning news
ससून रूग्णालय निवासी डॉक्टर संप इशारा बातमी

पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. एकीकडे वाढत असलेली रूग्ण संख्या तर दुसरीकडे कमी पडत असलेली आरोग्य यंत्रणा यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान तयार झाले आहे. गेल्या वर्षभरापासून ससूनमध्ये कोविड आणि नॉन कोविड रूग्णालयात काम करणाऱ्या 450 हून अधिक निवासी डॉक्टर संपावर जाण्याची शक्यता आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही नक्कीच संपावर जाऊ, असा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे.

ससूनमधील निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला आहे

वर्षभरापासून बंद आहे प्रशिक्षण -

ससूनमधील निवासी डॉक्टर हे गेल्या वर्षभरापासून कोविड आणि नॉन कोविडसाठी काम करत आहेत. हे काम करत असताना त्यांना दिली जाणारे इतर प्रशिक्षण हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. जर त्यांना इतर प्रशिक्षण मिळाले नाही तर भविष्यात पब्लिक हेल्थ वर याचा परिणाम होईल. अभ्यासाचे एक वर्ष फक्त कोविड ड्युटीमध्ये गेले आहे. वर्षभर आम्ही प्रशासनाला सहकार्य केले आहे. त्यांच्या हातात एका वर्षाचा कालावधी होता. या काळात प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती शक्य होती. मात्र, प्रशासनाने तसे केले नाही. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या दुसऱ्या लाटेतही आम्हाला कोविड आणि नॉन कोविड ड्युटी लावण्यात आल्या आहे. त्यामुळे आम्ही शिकायचे कसे आणि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने लवकरात लवकर आमचे प्रशिक्षण सुरू करावे, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे.

वर्षभरापासून आमच्यावरच ताण का?

वर्षाभरापासून आम्ही कोविड ड्युटी बरोबरच नॉन कोविड रूग्णांसाठी काम केले आहे. 18-18 तास आम्ही काम केले आहे. याचा आमच्यावर खूप मोठा ताण आहे. आम्हाला आमच्या अभ्यासात लक्ष देता येत नाही, अशा तक्रारी निवासी डॉक्टरांच्या आहेत.

हेही वाचा - नायर रूग्णालयात मार्डचे डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात

Last Updated : Apr 5, 2021, 1:22 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.