ETV Bharat / state

पुण्यात रेमडेसिवीरचा काळा बाजार; चढ्या दराने वॉर्डबॉय विकत होता इंजेक्शन्स

author img

By

Published : Sep 23, 2020, 7:34 PM IST

कोविडवर परिणामकारक ठरत असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन्स स्टार हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉय आणि सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेने चढ्या दराने विकले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुस्तफा अब्दुल गफार तांबोळी यांनी निगडी पोलिसात अर्ज दिला आहे.

Remdesivir sold at high prices in pune black market
पुण्यात रेमडेसिवीरचा काळा बाजार; चढ्या दराने वॉर्डबॉय विकत होता इंजेक्शन्स

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा काळा बाजार होत असल्याचे समोर आले आहे. कोविडवर परिणामकारक ठरत असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन्स स्टार हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉय आणि सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेने चढ्या दराने विकले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुस्तफा अब्दुल गफार तांबोळी यांनी निगडी पोलिसात अर्ज दिला आहे. त्यानुसार सुरक्षा रक्षक वैष्णवी टाकुरकर, वार्ड बॉय शाहिद शेख आणि विजय रांजणे यांची निगडी पोलीस कसून चौकशी करत आहेत. याप्रकरणी रुग्णालयाचे संचालक डॉ. अमित वाघ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून रुग्णालयात ही घटना घडली नसल्याचे त्यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना सांगितले आहे. दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शनची मूळ किंमत 5 हजार 400 रुपये आहे. मात्र अत्यवस्थेत असणाऱ्या कोरोना रुग्णांना ही इंजेक्शन आवश्यक असल्याने याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

पुण्यात रेमडेसिवीरचा काळा बाजार...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जदार मुस्तफा यांच्या आई कोविड पॉझिटिव्ह असल्याने त्यांना आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने मुस्तफा यांच्या आईला रेमडेसिवीरची इंजेक्शन्स द्यावी लागतील असे डॉ. अमित वाघ यांनी सांगितले. तसे डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली. अगोदर हे इंजेक्शन्स उपलब्ध झाले. मात्र, पुन्हा इंजेक्शन्स द्यावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, तेव्हा रेमडेसिवीर उपलब्ध न झाल्याने अर्जदार मुस्तफा यांनी वॉर्डमध्ये काम करणारा वॉर्डबॉयला याविषयी विचारणा केला असता, इंजेक्शन्स मिळतील पण त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील, असे वॉर्डबॉय शाहिद शेख याने सांगितले. दोन इंजेक्शन्स 15 हजार 600 रुपयांना गरज असल्याने विकत घेतले असल्याचे मुस्तफा यांनी सांगितले. दरम्यान, अर्जदाराच्या मित्राच्या वडिलांना देखील भोसरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. कोविड असल्याने त्यांना देखील रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता होती. अनेक ठिकाणी विचारणा केल्यानंतरही इंजेक्शन्स मिळत नसल्याने मुस्तफा याने संबंधित वॉर्डबॉयशी संपर्क केला आणि इतर वॉर्डबॉय आणि सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेच्या मदतीने चढ्या दराने एक इंजेक्शन (6 हजार रुपयांना) घेतले. याप्रकरणाचा व्हिडिओ तरुणांनी चित्रित केला असून त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. निगडी पोलीसात या प्रकरणी अर्ज देण्यात आला असून पोलीस चौकशी अंती निर्णय घेणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.