पुणे : कसबा पोटनिवडणुकीत पहिल्या दिवसापासून अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. याच आरोपावर नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांना विचारले असता ते म्हणाले की ज्या पद्धतीने निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून आरोप प्रत्यारोप झाले, हे खूप चुकीचे होते. अनेक नेते मंडळी हे भारतीय जनता पक्षाचे इथे आले त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केले ते खूपच चुकीचे होते. या निवडणुकीत माझा नव्हे तर जनतेचा विजय झाला आहे.असे यावेळी धंगेकर म्हणाले.
फडणवीसांचे राजकारण चुकीचे : ते पुढे असे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राजकारण केले, ते खूपच चुकीचे आहे. राज्यात तसेच देशात अनेक नेते मंडळी झाले ज्यांना समाज नमस्कार करतो. मग ते सत्तेत असो किंवा नसो.शरद पवार, नितीन गडकरी,असे अनेक मंत्री तसेच नेते असतील ज्यांना आजही समाज नमस्कार करतो. पण ज्या पद्धतीच राजकारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत असतात त्यात फक्त द्वेष असतो. कसबा पोट लनिवडणुकीत बाबत धंगेकर म्हणाले की गेल्या 20 वर्षापासून मी आमदार पदासाठी प्रयत्न करत होतो. माझ्या कार्यालयात येणाऱ्या माणसाला मी कधीच रिकामेपोटी पाठवले नाही. हेच काम मी पुढे अश्याच पद्धतीने सुरू ठेवणार असल्याचे यावेळी धंगेकर यांनी सांगितले. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत. यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
अनेक आरोप प्रत्यारोप : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत राज्यातील सर्वच आजी-माजी मंत्री यांच्या सभा रॅली तसेच कोपरा मीटिंग घेण्यात आले होते निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटचं मतदान होण्यापर्यंत दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप होत होते.
राज्यातील सर्वच नेते मंडळी कसब्यात : कसबा पोटनिवडणुकीत सुरवातीपासूनच प्रचारात स्थानिक मुद्दे बाजूला आणि देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा बघायला मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन प्रचारात पहायला मिळाले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात देखील माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळी पाहायला मिळाले.
खासदार गिरीश बापट यांचे महत्त्व : कसबा मतदारसंघ म्हटले की खासदार गिरीश बापट यांचे नाव आलेच. कारण गेले पाच वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट यांना कसब्यातील किंगमेकर असे म्हटले जाते. पण गेल्या काही महिन्यांपासून खासदार गिरीश बापट हे आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत बापट प्रचाराला येणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी असतील तसेच विरोधी पक्षातील नेते मंडळी असतील या सर्वच नेत्यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली, आणि दुसऱ्याच दिवशी बापट प्रचाराला आले.
हेही वाचा : Virat Anushka In Ujjain : विरुष्काने घेतले बाबा महाकालचे दर्शन, केली 'ही' प्रार्थना