पिंपरी-चिंचवड - फेसबुकवर ओळख झालेल्या विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर शारीरिक अत्याचार ( Rape On Widow Women In Pimpari Chinchwad ) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात 28 वर्षीय आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारीरिक संबंधाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवरून ओळख झालेल्या विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. 28 वर्षीय आरोपीची पीडित विधवा महिलेसोबत फेसबुकवरून ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघे एकत्र काम करायचे. यातूनच त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. मैत्रीचा गैरफायदा घेऊन आरोपीने हिंजवडीतील लॉजवर नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध केले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ चित्रित केले, अस तक्रारीत म्हटलं आहे. व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अनेकदा आरोपीने शारीरिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.