ETV Bharat / state

धक्कादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीचे हात पाय बांधून लैंगिक अत्याचार

जानेवारी महिन्यात सात तारखेला अल्पवयीन मुलीचे आई वडील हे कामावर गेले असता आरोपीने अल्पवयीन मुलीला राहत्या घराच्या टेरेसवर बळजबरीने घेऊन गेला. तुझ्या आई-वडिलांना जीवे ठार मारले, अशी धमकी दिली आणि ओढणीने तोंड बांधून आणि दोरीने हात पाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

bhosri police station
भोसरी पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 8, 2021, 3:36 PM IST

Updated : Feb 8, 2021, 5:13 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर विवाहित नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे अल्पवयीन मुलीला आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत दोरीने हात पाय आणि ओढणीने तोंड बांधून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी 29 वर्षीय नराधमाविरोधात भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलीस अधिकारी याबाबत माहिती देताना.

आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन केला लैंगिक अत्याचार -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात सात तारखेला अल्पवयीन मुलीचे आई-वडील हे कामावर गेले असता आरोपीने अल्पवयीन मुलीला राहत्या घराच्या टेरेसवर बळजबरीने घेऊन गेला. तुझ्या आई-वडिलांना जीवे ठार मारले, अशी धमकी दिली आणि ओढणीने तोंड बांधून आणि दोरीने हात पाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा - नागपूर; दादागिरी करणाऱ्या गुंडाची जमावाने केली दगडाने ठेचून हत्या

आरोपीला भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या -

याप्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेच्या 12 दिवसानंतर पीडित मुलीने आई वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही गंभीर घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, आरोपी आणि पीडित अल्पवयीन हे शेजारी राहण्यास असून त्यांची ओळख होती, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Last Updated : Feb 8, 2021, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.