ETV Bharat / state

व्याजापोटी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नकार दिल्याने केला बलात्कार - बलात्कार

व्याजापोटी शरीर सुखाची मागणी केल्यानंतर महिलेने नकार दिला. यामुळे संतापून महिलेच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देत पिस्तूलाचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील तळेगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी किरण रंभाजी घारे आणि दीपक प्रकाशचंद ओसवाल यांना अटक करण्यात आली आहे.

शरीरसुखाची मागणी
शरीरसुखाची मागणी
author img

By

Published : Aug 10, 2021, 6:24 PM IST

पिंपरी-चिंचवड - व्याजापोटी शरीरसुखाची मागणी केल्यानंतर महिलेने नकार दिला. यामुळे संतापून महिलेच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देत पिस्तूलाचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील तळेगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी किरण रंभाजी घारे आणि दीपक प्रकाशचंद ओसवाल यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 26 वर्षीय महिलेने आरोपी किरण कडून एक लाख रुपये व्याजाने घेतले, त्याबदल्यात पीडित महिलेने पन्नास हजारांचे दोन चेक दिले होते. मात्र, आरोपी किरणने व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याला महिलेने विरोध दर्शविला. त्यावर संतापून किरणने पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन पिस्तूलाचा धाक दाखवत महिलेला फॉर्च्युनर मोटारीत बसविले आणि लॉजवर नेऊन बलात्कार केला. गंभीर बाब म्हणजे याच मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले, असे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून महिलेला वारंवार ब्लॅकमेल करून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.