पुणे - जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील उंबरकास शिवारात सोमवारी दुपारी शेतात एका महिलेचा मृतदेह आढळला. गवत कापण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय विवाहित महिलेचा तोंड दाबून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडित महिला गरोदर असल्याचे समोर आले आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेचा शोध घेतला असता ऊसाच्या शेतात ही महिला नग्न अवस्थेत सापडली. महिलेच्या तोंडात बोळा कोंबलेला आढळला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.
22 वर्षे वय असलेल्या या महिलेला तीन वर्षाची एक मुलगी आहे. सदर महिला गरोदर असल्याचे उघड झाले असून या महिलेवर बलात्कार करून खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पिडित महिलेचा मृतदेह नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे