पुणे - तुम्ही काही केलंच नसेल तर घाबरायचं कारण काय, मोकळ्या मनाने चौकशीला सामोरे जा, असे वक्तव्य भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी केले आहे. पुण्यात भाजपच्या जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
आज निवडणूक समोर ठेवून ही कारवाई केली असे ते म्हणत आहेत, परंतू त्यांच्या काळातच ही चौकशी सुरू झाली होती. टप्प्या-टप्प्याने ही चौकशी पुढे गेली. आता याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी काही केलेच नसेल तर घाबरायचं कारण काय. त्यांनी मोकळ्या मनाने चौकशीला सामोरे जावे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा - पवारांच्या बचावासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर
आमच्या सरकारच्या काळात बँक नफ्यात आाली आहे. काही समाजसेवी संघटना न्यायालयात गेल्यामुळे न्यायालयाने भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे सांगितले. त्यानुसारच हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बँक आम्ही बरखास्त केली नाही. गुन्हे आम्ही दाखल केले नाही. यामध्ये कोणीही बडा किवा छोटा मासा असेल तो अडकला तो अडकला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करू शकत नाही, असे दानवे म्हणाले.
हे ही वाचा - पवारांच्या अंगावर हात टाकून भाजपने 'वाघाला' डिवचले, जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
आघाडी सरकारच्या काळात ज्यांनी कारखाने डबघाईला आणले त्यांनीच परत ते विकत घेतले. त्यामुळे आमच्या काळात नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी या बँकेवर प्रशासक मंडळ नेमले होते. सर्व प्रकरण आघाडीच्या काळात झाले आहे. आता आमच्या काळात शहर बंद करून काय उपयोग असा सवाल ही त्यांनी केला.
दरम्यान, युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता युतीचा निर्णय पितृपक्ष संपल्यावर होईल, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा - ईडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी जाणार, पवारांनी केले स्पष्ट