ETV Bharat / state

Rakshabandhan : पुण्यातील बाजारात बाहुबली, केक, चॉकलेट राख्यांना मोठी मागणी, पहा व्हिडिओ - chocolates rakhi

पुण्यातील 80 वर्ष जुनी असलेल्या मुर्तिज बेकरीनं रक्षाबंधन खास बनवण्यासाठी चॉटलेटच्या राख्या बनवल्या आहेत. ग्राहकांची या राख्यांना पसंती मिळतेय. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून सर्वधर्मीय सणानिमित्त मुर्तिज बेकरी चॉकलेटच्या वस्तू बनवत असते. यंदा रक्षाबंधनासाठी चॉकलेट राख्या बनविण्यात आल्या आहेत.

चॉकलेट राख्यांना बाजारात मागणी
चॉकलेट राख्यांना बाजारात मागणी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 11:26 AM IST

राख्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

पुणे: बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण 30 ऑगस्टला साजरा होणार आहे. रक्षाबंधनासाठी पुण्यातील बाजारपेठेत आकर्षक राख्या आल्या आहेत.बाजारात विविध प्रकारच्या राख्या जरी दाखल झाल्या असल्या तरी चॉकलेट राख्यांना ग्राहकांची पसंती अधिक असल्याचं दिसत आहे.पुण्यातील मुर्तिज बेकरीमध्ये आकर्षक अशा चॉकलेटच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. बच्चे कंपनी या राख्या खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत.

अशी झाली सुरुवात : पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या मुर्तिज बेकरीमध्ये गेल्या 10 ते 12 वर्षापासून या चॉकलेटच्या राख्या तयार केल्या जातात. रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, त्यानंतर काहीतरी गोड खायला द्यायची परंपरा आहे. हीच परंपरा लक्षात घेत मुर्तिज बेकरीचे मालक विक्रम मूर्ती यांनी चॉकलेट राख्या बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त एक-दोन प्रकारच्याच चॉकलेट राख्या तयार केल्या जात होत्या. मात्र नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्यानं आता या चॉकलेटमध्ये 10 ते 12 प्रकार तयार करण्यात आलेत.

ग्राहकांची पसंती : यंदाच्या रक्षाबंधनाच्यानिमित्त विविध प्रकारच्या चॉकलेट राख्या तयार करण्यात आल्या आहेत. या राख्यांबरोबर चॉकलेटच गिफ्टदेखील बनविण्यात आले आहे. लहान मुलांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांची देखील या चॉकलेट राखी आणि गिफ्टला पसंती मिळतेय. यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधल्यानंतर विविध चॉकलेट फ्लेवरनं बनविलेली चॉकलेट राखी खाता येऊ शकेल. मुर्तिज बेकरीमध्ये गुलाब, बाहुली, तसेच नावाची राखी,तसेच विविध प्रकारच्या चॉकलेट राख्या तयार करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक सणासाठी बनतात चॉकलेट पदार्थ : फक्त पुणे शहरातूनच नव्हे तर देशभरातील विविध ठिकाणाहून ग्राहकही या चॉकलेट राख्या खरेदी करण्यासाठी येत असतात. या(मूर्तिज) बेकरीमध्ये विविध सणांसाठी चॉकलेटचे पदार्थ हे बनविले जातात. विविध सणांसाठी विविध पदार्थ या बेकरीत बनवले जातात. राखी पौर्णिमेला चॉकलेट राख्या बनवल्या जातात. तर गणेशोत्सवात चॉकलेटपासून मोदक आणि दिवाळीत चॉकलेटचे फटाके अशा प्रकारचे पदार्थ बनविले जातात. विशेष म्हणजे या चॉकलेट राख्या हे अत्यंत अल्पदरात असतात. तर या चॉकलेट राख्या या सीमेवरील जवानांना देखील पाठवले जातात.

हेही वाचा-

  1. नरेंद्र मोदींना आहे एक पाकिस्तानी बहीण; 35 वर्षांपासून बांधते राखी
  2. दिव्यांग बांधवाला राखी बांधत महिला पोलिसांचे अनोखे रक्षाबंधन Women cops of UP Police tied rakhi to Divyang
  3. अनोखे रक्षाबंधन, महिलेने बिबट्याला बांधली राखी, पाहा व्हिडिओ Rakhi with Panther

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.