पुणे - संजय राऊत यांनी तोंडात येईल ते बोलू नये, या शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या वादावर त्यांनी संभाजीराजे राज्याभिषेक सोहळ्यात राऊत यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
दरम्यान, उदयनराजे यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असा हल्ला संजय राऊत यांनी केला होता. या वक्तव्यावरून संजय राऊत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंबाबत केलेल्या वक्तव्याचे खासदार संभाजीराजे यांनी समर्थन केले आहे. महाराजांचे खरे गुरू हे संत तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊ याच आहेत. 2 दिवस राज्यात वातावरण मलिन तयार झाले आहे. ज्या पुस्तकावर चर्चा व्हायली हवी त्यावर चर्चा न होता दुसऱ्याच विषयांवर चर्चा होत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. आपले राज्य हे महापुरूषांचे राज्य आहे. म्हणूनच ते दुसऱ्या राज्यांपेक्षा वेगळे आहे. म्हणून वेगळा आदर्श ठेवत आपण वाटचाल करणे गरजेचे आहे आणि राज्याला मलिन करू नका, अशी विनंतीही त्यांनी केली.
हेही वाचा - उदयनराजेंवरील टीकेनंतर साताऱ्यात बंद, गाढवांच्या गळ्यात राऊत-आव्हाडांच्या पाट्या बांधून निषेध