पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीसोबत घ्यायचे असेल, तर ३ जागा स्वाभिमानीला सोडले पाहिजे, असा अलटीमेंटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीला दिला आहे.
यासंदर्भात राजू शेट्टी म्हणाले, आमची १५ जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी आहे. उमेदवारही ठरले आहेत. त्यामुळे जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीसोबत घ्यायचे असेल तर हातकणांगलेसह बुलढाणा आणि वर्धा या ३ जागा स्वाभिमानीला सोडले पाहिजे. त्यासाठी उद्यापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा.