ETV Bharat / state

मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय - राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बांधण्यात आलेल्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत राज ठाकरे बोलत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

author img

By

Published : Jul 11, 2021, 3:12 PM IST

Updated : Jul 11, 2021, 3:45 PM IST

पुणे - महाविकास आघाडी सरकारमधील विविध नेत्यांवर सध्या मोठ्या प्रमाणावर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले होते की माझ्या मागे ईडी लावली की मी सीडी लावणार. म्हणून मी आता खडसेंच्या सीडीची वाट बघतोय, असे राज ठाकरे म्हणाले. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बांधण्यात आलेल्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

यंत्रणांचा गौरवापर केला जातोय -

केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, तेव्हाही यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. आत्ता केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही या यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या यंत्रणा हातातील बाहुली नाही की जो माणूस नको आहे त्याला संपवण्यासाठी या यंत्रणांचा वापर करायचा. हे अत्यंत चुकीची गोष्टी असून ज्यांनी खरंच गुन्हे केलेले आहे. ते मोकाट सुटलेले आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

कोण कोणाचा शत्रू, कोण कोणाचा मित्र...?

सध्या राज्यात सरकार आणि भाजपामध्ये जे संघर्ष सुरू आहे किंवा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये सुरू असलेली घुसमूस पाहता अस वाटतंय की कोण कोणाचा शत्रू आहे आणि कोण कोणाचा मित्र आहे, हे कळतच नसल्याचे ठाकरे म्हणाले.

...मग अडलंय कुठे?

मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वच राजकीय पक्षांना मान्य आहे. तर मग अडलंय कुठे, असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला. आरक्षणाचा विषय बनवायचा आणि मराठा समाजाच्या तरुणांचे डोकी भडकवायची एवढंच फक्त उपयोग आहे का. ओबीसी समाजाचा प्रश्न जर केंद्र सरकारला मान्य आहे आणि राज्य सरकारलाही मान्य आहे तर मग तेदेखील कुठे अडलंय. कोर्टात व्यवस्थित बाजू का मांडली जात नाही. या दोन्ही समाजाने मतदान करतेवळी त्यांनी पहिले पाहिजे, असेही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.

Last Updated : Jul 11, 2021, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.