पुणे - शहराच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. पुरंदरे यांच्या पर्वती पायथा येथील निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांनी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून पुण्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नियोजन केले. दरम्यान, या बैठका झाल्यानंतर मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली आहे.
राज ठाकरे नेहमी आमच्या घरी येतात. आम्हीही त्यांच्या घरी जातो. त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे पुण्यात आले, की माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नेहमी येतात. आजही ते मुंबईला जाता जाता माझी भेट घेऊन गेले, असे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.