ETV Bharat / state

भारत धर्मशाळा आहे का? नागरिकत्व कायद्यावरून राज ठाकरेंचा मोदी सरकारला प्रश्न - मनसे पुणे

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. या विरोध आंदोलनावेळी अनेक ठिकाणी हिंसा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे.

raj thackeray
राज ठाकरे
author img

By

Published : Dec 21, 2019, 12:24 PM IST

Updated : Dec 21, 2019, 2:52 PM IST

पुणे - देशातील आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकारने हा सर्व प्रताप सुरू केला आहे. सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात केंद्र सरकारवर टीका केली आहे. १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला आणखी लोकांची काय गरज आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

हेही वाचा - 'जनादेशाचा अनादर करणारे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही'

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. या विरोध आंदोलनावेळी अनेक ठिकाणी हिंसा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे.

आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा पारित करण्याची खेळी केली आहे. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून आलेल्यांना भारतातून हाकलून द्या, असले कायदे आणून येथे गोंधळ घालण्याची गरज नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. .

हेही वाचा - राज्यात बिन पैशाचा तमाशा सुरू - राज ठाकरे

आधी भारतातील स्थानिक प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असून बाहेरच्या लोकांना पोसण्याची गरज नाही. भारतातील मुस्लिमांनी कधीच दंगल केली नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. राज्यात बाहेरच्या देशातील किती लोक येतात याची सर्व माहिती पोलिसांना आहे. मात्र, पोलिसांचे हात बांधलेले असल्याने ते कारवाई करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Dec 21, 2019, 2:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.