ETV Bharat / state

ध्येयवेड्या पर्यावरणवादी पुणेकराला शहरातील सगळ्यात मोठा 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प राबवण्यात यश - विवेक बापट

विवेक बापट असे त्या ध्येयवेड्या अभियंत्याचे नाव आहे. या वैशिष्टपूर्ण जलव्यवस्थापनाच्या प्रयोगाचा 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा...

पुणे
author img

By

Published : Jun 21, 2019, 9:13 AM IST

पुणे - गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेले तापमान आणि लांबलेल्या पावसामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच जल पुनर्भरणाचा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित झाला आहे. मात्र, इस्रायलच्या पाणी व्यवस्थापनाने प्रभावित झालेल्या पुण्यातील एका अभियंत्याने गेल्या 27 वर्षांपासून जल पुनर्भरणाचा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला आहे. विवेक बापट असे त्या ध्येयवेड्या अभियंत्याचे नाव आहे. या वैशिष्टपूर्ण जलव्यवस्थापनाच्या प्रयोगाचा 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा.

ध्येयवेड्या पर्यावरणवादी पुणेकराला शहरातील सगळ्यात मोठा 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प राबवण्यात यश

कुठल्याही देशाच्या आर्थिक विकासाची मदार जशी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असते, तशीच ती पाण्याच्या उपलब्धतेवरदेखील असते. त्यामुळे औद्योगिक आणि आर्थिक विकासामध्ये पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. इस्रायलने केलेली प्रगती हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. त्यामुळे इस्त्रायलच्या व्यवस्थापनाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून पुण्याचा सहकारनगरमध्ये राहणाऱ्या विवेक बापट यांनी 1982 मध्ये पहिल्यांदा त्यांच्या शनिवार पेठेतील घरात जलपुनर्भरण याचा प्रकल्प राबवला होता.

बापट हे व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर आहेत. मात्र, शेती आणि पर्यावरणाप्रती विशेष आकर्षण असल्यामुळे बापट यांनी पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. त्यांनी याची सुरुवात त्यांच्या इमारतीपासूनच केली आहे. त्यांनी सुरुवातीला त्यांच्या शनिवार पेठेतील घरात जलपुनर्भरण याचा प्रकल्प राबवला होता. त्यानंतर त्यांच्या पर्वती येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातदेखील जलपुनर्भरण प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

तसेच 2013 मध्ये नऱ्हे येथे त्यांच्या नव्याने बांधलेल्या औद्योगिक इमारतीमध्ये त्यांनी वर्षाला तब्बल 12 लाख लिटर पावसाचे पाणी जमा करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. बहुदा पुण्यातील जल पुनर्भरणाचा हा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी बापट यांनी तब्बल 20 लाख रुपये खर्च केले आहेत. त्याप्रमाणेच बरीचशी जागा नैसर्गिक पद्धतीने पाणी मुरण्यासाठी मोकळी ठेवली आहे. तर पाण्याची साठवणूक करण्यासाठी 1 लाख लिटरची पाण्याची टाकीदेखील या इमारतीमध्ये बांधण्यात आलेली आहे.

त्यामुळे पुण्यालगतच्या एका ग्रामपंचायत परिसरात असलेल्या या इमारतीची पाण्याची गरज पावसामुळे साठणाऱ्या पाण्याद्वारे पूर्ण करण्यात बापट यांना यश आले आहे, तर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना ग्रामपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर बापट अन्य गृहनिर्माण संस्थांमध्येदेखील अशाच पद्धतीने जलपुनर्भरण प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Intro:पुणे - गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेले तापमान आणि लांबलेल्या पावसामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच जल पुनर्भरणाचा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित झाला आहे. मात्र, इजराइलच्या पाणी व्यवस्थापनाने प्रभावित झालेल्या पुण्यातील एका अभियंत्याने गेल्या 27 वर्षांपासून जल पुनर्भरणाचा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला आहे. या वैशिष्टपूर्ण जलव्यवस्थापनाच्या प्रयोगाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

Body:कुठल्याही देशाच्या आर्थिक विकासाची मदार जोशी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असते, तशीच ती पाण्याच्या उपलब्धतेवर देखील असते. त्यामुळे औद्योगिक आणि आर्थिक विकासामध्ये पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. इस्रायलने केलेली प्रगती हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल.

त्यामुळे इस्त्रायलच्या व्यवस्थापनाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून पुण्याचा सहकारनगरमध्ये राहणाऱ्या विवेक बापट यांनी 1982 साली पहिल्यांदा त्यांच्या शनिवार पेठेतील घरात जलपुनर्भरण याचा प्रकल्प राबवला होता.

बापट हे व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर आहेत. मात्र, शेती आणि पर्यावरणाप्रती विशेष आकर्षण असल्यामुळे बापट यांनी पर्यावरण पूरक प्रकल्प राबवण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. त्यांनी याची सुरुवात त्यांच्या इमारती पासूनच केली आहे. त्यांनी सुरुवातीला त्यांच्या शनिवार पेठेतील घरात जलपुनर्भरण याचा प्रकल्प राबवला होता. त्यानंतर त्यांच्या पर्वती येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात देखील जलपुनर्भरण प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

तसेच सन 2013 मध्ये नर्हे येथे त्यांच्या नव्याने बांधलेल्या औद्योगिक इमारतीमध्ये त्यांनी वर्षाला तब्बल 12 लाख लिटर पावसाचे पाणी गोळा करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. बहुदा पुण्यातील जल पुनर्भरणाचा हा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी बापट यांनी तब्बल 20 लाख रुपये खर्च केले आहेत. त्याप्रमाणेच बरीचशी जागा नैसर्गिक पद्धतीने पाणी मुरण्यासाठी मोकळी ठेवली आहे. तर पाण्याची साठवणूक करण्यासाठी 1 लाख लिटरची पाण्याची टाकी देखील या इमारतीमध्ये बांधण्यात आलेली आहे.

त्यामुळे पुण्या लगतच्या एका ग्रामपंचायत परिसरात असलेल्या या इमारतीची पाण्याची गरज पावसामुळे साठणाऱ्या पाण्याद्वारे पूर्ण करण्यात बापट यांना यश आले आहे. तर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना ग्रामपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर बापट अन्य गृहनिर्माण संस्थांमध्ये देखील अशाच पद्धतीने जलपुनर्भरण प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.