ETV Bharat / state

पहिल्याच पावसाने पुणे तुंबले; महापालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल

पुण्यात नालेसफाईसाठी दरवर्षी ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, यंदा हा सर्व खर्च पाण्यात गेल्याचे उघड झाले आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे.

author img

By

Published : Jun 25, 2019, 12:17 PM IST

लष्कर पोलीस ठाण्याला आलेले तलावाचे स्वरुप

पुणे - पावसाळ्यापूर्वी पुणे महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील नालेसफाई केल्याचा दावा केला होता. मात्र, सोमवारच्या पावसाने शहरातील अनेक नाले, गटारी मोठ्या प्रमाणात तुंबले होते. त्यामुळे त्यांचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे.

लष्कर पोलीस ठाण्याला आलेले तलावाचे स्वरुप

सोमवारी पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे लष्कर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे पोलीस ठाण्याला तलावाचे स्वरुप आले होते. या पाण्यात नागरिकांच्या दुचाकी तसेच चारचाकी तरंगत असलेल्या पाहायला मिळाल्या. तसेच सिंहगड रोड, पर्वती, कोथरूड, धायरी, धानोरी आणि हडपसर परिसरात पाणी साचले होते.

पुण्यात नालेसफाईसाठी दरवर्षी ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, यंदा हा सर्व खर्च पाण्यात गेल्याचे उघड झाले आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. पुन्हा शहरात पाणी तुंबू नये यासाठी महापालिका काय उपाययोजना करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:पुण्यात सोमवारी पडलेल्या पावसाने पालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरलाय. कॅन्टोन्मेंट बोर्डाचाही कारभार चव्हाट्यावर आलाय.
पावसाळ्यापूर्वी पुणे महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील नालेसफाई केल्याचा दावा केला होता. मात्र सोमवारच्या पावसाने शहरातील अनेक नाले, गटारी मोठ्या प्रमाणात तुंबले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. शहरात साधारण 30 ते 40 ठिकाणी नाले तुंबून पाणी साठले होते. अनेक नागरिकांच्या घरातही पाणी घुसले होते. Body:पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. लष्कर पोलिस ठाण्याला तर तलावाचे स्वरूप आले होते. या पाण्यात नागरिकांच्या दुचाकी आणि चारचाकी तरंगत होत्या. पुण्यात साधारण 50 कोटीचा खर्च पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी करण्यात येतो. मात्र हा सर्व खर्च पाण्यात गेल्याचे या प्रकाराने उघड झाले. सिंहगड रोड, पर्वती, कोथरूड, धायरी, धानोरी आणि हडपसर परिसरात पाणी साचले होते. मात्र पालिकेने त्वरित उपाययोजना केल्याचा दावा केलाय.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.