हैदराबाद Global Warming : 2023 मध्ये पृथ्वीच्या सरासरी तापमानात अचानक वाढ झाल्यानं शास्त्रज्ञांनी भिती व्यक्त केलयी. युरोपियन जिओसायन्सेस युनियन ॲटमॉस्फेरिक केमिस्ट्री अँड फिजिक्समध्ये प्रकाशित झालेल्या पेपरमध्ये 2022 ते 2023 पर्यंत जवळपास 0.3 अंश सेल्सिअसची तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. इलिनॉय अर्बाना-चॅम्पेन विद्यापीठातील शिव प्रियम रघुरामन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी जागतिक सरासरी तापमानात अचानक वाढ झाल्याचं श्रेय एल निनो-सदर्न ऑसिलेशनला दिलंय.
तापमानात वाढ : "या समस्येचं गंभीर स्वरूप लक्षात घेता, आम्हाला मागील वर्षी तापमानात वाढ होण्याच्या प्राथमिक कारणाचा सखोल अभ्यास करायचा होता," असं या संशोधनाचे प्रमुख लेखक शिव प्रियम रघुरामन यांनी सांगितलं. रघुरामन यांनी रोझनस्टील स्कूलमध्ये पोस्टडॉक्टरल संशोधक म्हणून काम पूर्ण केलंय. संशोधकांनी अशा मॉडेल्सचं विश्लेषण केलं, ज्यामुळं हवामानात मानवाच्या हस्तक्षेपाशिवाय तापमानात वाढ होऊ शकते. एल निनोच्या अगोदर तापमानात वाढ होण्याची शक्यता असते. शिवाय, जवळजवळ सर्व स्पाइक्स एल निनो या तापमानवाढीसी संबंधित होते. 2023 ची तापमानवाढ मानवी-प्रेरित ग्लोबल वार्मिंग घटनांऐवजी एल निनोमुळं झाली होती.
2023 मध्ये अति उष्णतेचा अनुभव : 2023 मध्ये, जागतिक तापमानानं अभूतपूर्व पातळी गाठली होती. अनेक क्षेत्रांमध्ये अति उष्णतेचा अनुभव यावेळी आला होता. याच वर्षात तापमान विसंगती दिसून आली होती. विशेषतः युरोप आणि मध्य पूर्वेतील काही भागांमध्ये, उष्णतेच्या लाटांनी विक्रमी उच्चांक गाठला होता. तिथं अनेकदा 40°C (104°F) पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली होती. महासागरांचं तापमान देखील सामान्य तापमानापेक्षा जास्त होतं. त्यामुळं तीव्र वादळं, दुष्काळासाठी परिस्थिती जगाच्या अनेक भागात दिसून आली होती.
"हरितगृह वायूंचं मानवी उत्सर्जन दीर्घकालीन तापमानवाढीसाठी जबाबदार आहे. CO2 आणि इतर हरितगृह वायूंचं उत्सर्जन शून्यावर येईपर्यंत तापमानवाढ चालूच राहील," - ब्रायन सोडेन, अभ्यासाचे सह-लेखक
हवामानावर लक्षणीय परिणाम : एल निनो ही एक पर्यावरणीय घटना आहे, जी मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानवाढीद्वारे दर्शविली जाते. यामुळं जागतिक हवामानावर लक्षणीय परिणाम होतो. एल निनो पर्यावरण आणि हवामान बदलांना कारणीभूत ठरू शकतो, असं अभ्यासात म्हटलं आहे.